You are currently viewing मालवणात दिवाळी सुट्टी निम्मित विकेंडला पर्यटकांची सर्वाधिक पसंती

मालवणात दिवाळी सुट्टी निम्मित विकेंडला पर्यटकांची सर्वाधिक पसंती

मालवण :

 

मालवणात दिवाळी सुट्टी निम्मित विकेंडला पर्यटकांची सर्वाधिक पसंती असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी शनिवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक मालवणात दाखल झाले. शनिवारी सागरी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी दांडी, जेटी, चिवला यासह सर्वच किनाऱ्यावर होती. वॉटर स्पोर्ट्स व समुद्री स्नानाचा आनंद पर्यटक लुटत होते.

पर्यटकांची मालवणच्या सर्वच किनाऱ्यावर हाऊसफुल्ल गर्दी असून मालवणचे पर्यटन बहरून गेले आहे. आगामी काही दिवस पर्यटकांचा ओघ कायम असल्याचे पर्यटकांच्या आगामी बुकिंग वरून दिसून येत आहे. दोन वर्षे कोरोना संकटात मोठे नुकसान झालेल्या पर्यटन व्यावसायिकांसाठी नव्या पर्यटन हंगामाची सुरवात दमदार झाली आहे.

तारकर्ली, देवबाग, मालवण शहर परिसरातील बहुतांश सर्वच हॉटेल दोन दिवस फुल्ल झाली आहे. पर्यटकांना राहण्यासाठी रूम शोधण्याची वेळ आली. रूम न मिळाल्याने काही पर्यटकांना माघारी परतून अन्य ठिकाणी राहण्याची राहण्याची व्यवस्था करावी लागली. मालवणचे पर्यटन वाढत असले तरी अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंगची अपुरी सुविधा या समस्या दूर करण्याच्या दृष्टीने उपाययोजनांची गरज आल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा