मंत्री चंद्रकांत दादा पाटील, दीपक केसरकर, शंभुराजे देसाई, खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते गौरव
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचा ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार’ भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांना प्रदान करण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई, सिक्कीमचे माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील, राज्य नियोजन मंडळ अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार अच्युत सावंत-भोसले यांना प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्या सौभाग्यवती अँड. अस्मिता सावंत-भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचं पाहिलं अधिवेशन महाबळेश्वरनजीकच पुस्तकांचं गाव भिलार इथं होत असून महाराष्ट्र महागौरव पुरस्कारानं भोसले नॉलेज सिटीच्या माध्यमातून कोकणाच नाव जगभरात पोहचणारे, शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे BKC ब्रॅण्डचे शिल्पकार अच्युत सावंत-भोसले, सौ. अँड. अस्मिता सावंत-भोसले यांचा सन्मान करण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई, सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील, राज्य नियोजन मंडळ अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार अच्युत सावंत-भोसले यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी आमदार जयकुमार गोरे, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष राजा माने, कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण आदींसह राज्यातील संपादक, पत्रकार उपस्थित होते.