लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने सोमवार दि. 31 ऑक्टोबर ते रविवार दि. 6 नोव्हेंबर 2022 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग ॲन्टी करप्शन ब्युरोचे पोलिस उपअधीक्षक दिपक कांबळे यांनी दिली.
भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र घडवुया या उद्देशाने लाच देणे व लाच घेणे हे कायद्याने गुन्हा आहे. कोणतेही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी लागणाऱ्या शुल्का व्यतिरिक्त अन्य पैशाची, वस्तुची मागणी करीत असेल, तर ती लाच आहे. अशाप्रकारे कोणीही पैशाची, वस्तुची मागणी केली तर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या टोल फ्री क्रमांक 1064 आणि 9930997700 या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा www.acbmaharashtra.gov.in या संकेत स्थळावर तक्रार करावी, असे आवाहन सिंधुदुर्ग ॲन्टी करप्शन ब्युरोने केले आहे.