You are currently viewing मालवण नगरपरिषदेतर्फे पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण सुरू

मालवण नगरपरिषदेतर्फे पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण सुरू

मालवण

मालवण नगरपरिषदेच्यावतीने दि. २१ ऑक्टोबर २०२२ पासून मालवण शहरात स्थानिक पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण सूरु करण्यात आले आहे. सदर सर्वेक्षण शासनाने तयार केलेल्या (HAWKER) अॅपद्वारे करण्यात येणार आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर पथविक्रेत्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येतील. पथ विक्रेता समिती स्थापन झाल्यानंतर आवश्यक त्या सोई सुविधा समितीच्या माध्यमातून नियोजित करण्यात येतील, तरी मालवण नगरपरिषद मार्फत सुरु असलेल्या पथविक्रेता सर्वेक्षणासाठी संबंधितांनी आवश्यक नोंद घेवून या सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. संतोष जिरगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

यामध्ये पायाभूत सुविधा (उदा. पदपथ पाणीपुरवठा, स्वच्छतागृह, कचराकुंडी, दिवाबत्ती इत्यादी) सोयी उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. तसेच इतर विभागाशी समन्वय त्यामध्ये पोलीस खाते, वाहतूक पोलीस, सार्वजनिक आरोग्य विभाग, जमीन व महसूल विभाग, स्थानिक नागरिक संस्था या विभागाशी नियुक्त पथ विक्रेता समिती मार्फत समन्वय साधला जाईल. तसेच पथविक्रेत्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी, व्यवसायाकरिता खेळते भांडवल, संसाधन संस्थामार्फत वित्तीय साक्षरता कार्यक्रम आयोजित करणे, स्वयंम रोजगार कार्यक्रम या उपांगामार्फत खेळते भांडवल तसेच मुलभूत बँकिंग व आर्थिक सेवा देण्याचे या सर्व्हेक्षणाअंतर्गत प्रस्तावित आहे. त्याचबरोबर सामाजिक सुरक्षा योजनाशी सांगड घालणे त्यामध्ये स्वनिधी से समृद्धी योजना त्या अंतर्गत प्रधानमंत्री विमा योजना, प्रधानमंत्री जीवनविमा योजना इत्यादी योजनांचा लाभ नोंदणीकृत पथविक्रेत्यांना अनुज्ञेय राहील असेही मुख्याधिकारी श्री. संतोष जिरगे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा