You are currently viewing आरोस-दांडेली येथील “मिस दीपावली” किताबाची तन्वी गोसावी मानकरी…

आरोस-दांडेली येथील “मिस दीपावली” किताबाची तन्वी गोसावी मानकरी…

जय हनुमान मित्र मंडळाचे आयोजन; नृत्य, वेशभूषा व खेळ पैठणीचा स्पर्धांनी कार्यक्रमाला रंगत…

सावंतवाडी

आरोस-दांडेली येथील जय हनुमान मित्र मंडळाच्या वतीने “दीपोत्सव” कार्यक्रमाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या “मिस दीपावली” स्पर्धेत तन्वी गोसावी हिने “बेस्ट स्माईल” सह प्रथम क्रमांकाचा किताब पटकाविला. तर द्वितीय येण्याचा मान इशा गोडकर व तृतीय क्रमांक स्नेहा शिरसाट हिने प्राप्त केला. दरम्यान “बेस्ट कॅटवॉक” जान्हवी कवठणकर, तर “बेस्ट हेअर स्टाईल” चा किताब नंदिनी बिले यांना देण्यात आला.

मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त “दीपोत्सव” कार्यक्रमाच्या माध्यमातून या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात समूह नृत्य स्पर्धेत कुडाळच्या चिमणी-पाखर ग्रुपने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर द्वितीय क्रमांक एम.जे डान्स अकॅडमी, सावंतवाडी यांना देण्यात आला. खुल्या गटातील एकेरी नृत्य स्पर्धेत प्रथम नंदिनी बिले, द्वितीय नेहा जाधव व दुर्वी पावसकर विभागून, तर तृतीय समर्थ गवंडी आदींनी क्रमांक पटकाविले. तसेच गाव मर्यादित एकेरी नृत्य स्पर्धेत हर्षाली आरोसकर व विरा परब यांना विभागून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. तर सानवी मोरजकर व हर्षा कवडेकर यांना विभागून द्वितीय क्रमांक देण्यात आला.

यावेळी घेण्यात आलेल्या लहान गटातील फॅन्सी ड्रेस स्पर्धेत प्रथम कार्तिक मडूरकर, द्वितीय स्वरूप माणगावकर, तर मोठ्या गटातून दीपेश शिंदे आणि शांताराम मालवणकर यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच होम मिनिस्टर कार्यक्रमात सिया राऊळ या पैठणीच्या मानकरी ठरल्या, तर दीपलक्ष्मी मालवणकर यांनी द्वितीय क्रमांकाचे चांदीचे नाणे जिंकले. दरम्यान विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

वेशभूषा आणि मिस दीपावली स्पर्धेचे परीक्षण प्रवीण मांजरेकर, हेमंत मराठे व कृतिका कोरगावकर यांनी केले. तर नृत्य स्पर्धांचे परीक्षण ओंकार कलामंचचे अध्यक्ष अनिकेत आसोलकर व मुंबईस्थित नृत्यदिग्दर्शक मंदार काळे यांनी केले. दरम्यान संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची शुभम धुरी यांनी पार पडली. यावेळी कार्यक्रमाला गोवा-पार्से येथील प्रवीण पार्सेकर यांनी उत्कृष्ट साऊंड सिस्टिम दिली. तर रंगमंच, लाईट व सीटिंग अरेंजमेंटची जबाबदारी ओंकार नाईक व अमोल आरोसकर यांनी यशस्वीरित्या सांभाळली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवा सेनेचे पदाधिकारी योगेश नाईक, पत्रकार आणि निवेदक जुईली पांगम, दिशा माणगावकर, श्रावणी नार्वेकर यांच्यासह जय हनुमान मित्र मंडळातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली.

यावेळी उपजिल्हा संघटन शब्बीर मणियार, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, राजा वाडकर, सतीश नार्वेकर, प्रवीण वाडकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा