कणकवली
राज्य सरकारने दिवाळीनिमित्त रेशन धारक ग्राहकांसाठी 100 रुपयात आनंद शीधा वाटप योजना जाहीर केली होती.
श्री.रामेश्वर वि.का.सोसायटी लि.करुळ रास्त धान्य दुकान येथे आनंद शिधा वाटपचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेतील आनंद शिधा वाटप शुभारंभ चेअरमन श्री.आण्णा तेंडुलकर, मंगेश कर्णिक, सेल्समन फोपे तसेच लाभार्थी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या योजनेचा ५०६ लाभार्थ्यांना लाभ होणार आहे.
राज्य सरकारने दिवाळीनिमित्त जाहीर केलेला आनंद शिधा हा सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन केले असून राज्य सरकारकडून शिधावाटप केल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले.
आण्णा तेंडुलकर यांनी मुख्यमंत्री,श्री.शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री श्री रवींद्रजी चव्हाण आणि आमदार मा.नितेशजी राणे यांचे आभार मानले असून या उपक्रमाचे स्वागत केले आहे.