You are currently viewing भाऊबीज

भाऊबीज

*जागतीकसाहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अर्चना मायदेव लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*भाऊबीज*

भाऊबीजे चा ग सण
आले डोळे ते भरून
येईल भाऊराया घरी
तोच आनंदाचा क्षण

बिजेची ग चंद्रकोर
जणू आकाशी कोरली
ओवाळाया भाऊ राया
बहीण केंव्हाची थांबली

वाट पाहाते मी त्याची
केव्हा येईल तो क्षण
आला आला भाऊराया
गेला सगळाच शीन

पृथ्वीच्या फिरण्याला
चंद्र सूर्याची ग साथ
बळ येई झुंजायाला
लाभे भाऊराया ची ग साथ

संसारातील काटे कुटे
जेंव्हा लागतात पाया
तेंव्हा येतोच आठव
माझ्या प्रिय भाऊराया

सौ. अर्चना मायदेव

प्रतिक्रिया व्यक्त करा