You are currently viewing भाऊबीज

भाऊबीज

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

*भाऊबीज*

भाऊबीज हा बहीण भावाच्या प्रेमाच्या नात्याचा सण आहे.कार्तीक शुद्ध द्वितियेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो.आणि संपूर्ण भारत देशात तो साजरा होतो.
उत्तर प्रदेशात यास भाई दूज,नेपाळमधे भाई टीका असे म्हणतात.वेगवेगळ्या प्रांतातली संबोधने वेगळी असली तरी ,बहीण भावाच्या ऊत्कट प्रेमाचा हा उत्सवअसतो.
भाऊ बहिणीकडे येतो.सुरेख सजवलेल्या ताटात दीप लावून बहीण भावाला ओवाळते.आणि भाऊ यथाशक्ती
तिला ओवाळणीही देतो.आणि बहिणीकडच्या ,अपार मायेने केलेल्या सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतो.बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.आणि भाऊ तिच्या सर्वतोपरी संरक्षणाची शपथ घेतो.
द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा असतो.
बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत रहावं ही त्यामागची भावना असते.
तसेच या दिवशी असे मानतात की स्रीमधे देवत्व प्राप्त झालेले असते .तिच्या सान्नीध्या राहिल्याने भावाचे
व्यावहारिक आणि आध्यात्मीक वर्धन होते.या धार्मीक संकल्पनेमागे पुरुषांनी परक्या स्त्रीस भगिनी मानावे
आणि तिला निर्भय सुरक्षित आयुष्य लाभावे हा पवित्र हेतु असतो.
भाऊबीजेच्या दिवशी चंद्राला ओवाळण्याची प्रथा आहे.
जिला भाऊ नाही किंवा बंधुभेट होणे शक्य नाही
ती बहीण चंद्राला भावाच्या रुपात ओवाळते.म्हणूनच लहान मुलांचा तो चांदोमामा असतो.
कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाउन दौत टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात.
भाऊबीजेला यमद्वितिया असेही म्हणतात.या दिवशी यमाने त्याची बहीण यमी (यमुना)हिला वस्त्रालंकार देऊन
तिच्याकडे भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितियाही म्हणतात.यम आणि यमीच्या बंधुभगिनी प्रेमाची ती आठवण मानतात.उत्तरेत यादिवशी यमुनेत
स्नान करण्याची प्रथा आहे.दीर्घायुष्यासाठी यमाचीही पूजा केली जाते…
विधी,पद्धती रिती विवीध असल्या तरी बहीण भावाच्या
नात्यातले ममत्व हे सामायिक आहे.हे परंपरेने पूर्वापार चालत आलेले आहे.आणि आजही ही काळाची गरज आहे.आजच्या यांत्रीक युगाचे अनेक फायदे जरी असले तरी समाज विखुरलाय्.संवाद हरवलेत.नाती दुरावली आहेत.स्वार्थ ,स्पर्धा मधे संवेदना हरवल्यात. मूल्ये नष्ट झाली आहेत.प्रेम बोथट झालेय् .अशा वेळी हे नात्यांचे सण मनाला धीर देतात.आशावादी बनवतात .आधारभूत ठरतात.
सोनियाच्या ताटी।उजळल्या ज्योती।
ओवाळीते भाऊराया।वेड्या बहिणीची वेडी ही माया।
या ओळी एक निरोगी समाज घडवण्याची ताकद देतात…

*शुभ भाऊबीज!!*

सौ.राधिका भांडारकर पुणे…

Advertisement

🏠 *बांधकाम क्षेत्रात सिंधुदुर्गमध्ये एकच विश्वासू नाव*

*_श्री विसवटी कन्स्ट्रक्शन_*
*_मुकेश साळसकर_*

🏠 *आता तुमच्या घराचे बांधकाम आम्ही करून देणार तुमच्या बजेटमध्ये !* 🏠

🔸 *घराच्या डिझाईनपासून ते हॅन्डओव्हरपर्यंत १०० टक्के खात्रीशीर काम !*

🔸 *तुमच्या बजेटप्रमाणे रो-हाऊस, बंगलो, बिल्डिंगची कामे केली जातील.*

*_आमच्याकडून खालील सुविधा देण्यात येतात._*

♻️ *2D आणि 3D प्लॅन*
♻️ *RCC डिझाईन*
♻️ *मजबूत स्ट्रक्चर*
♻️ *दर्जेदार बिल्डिंग मटेरियल व तेवढाच उत्तम कामगार वर्ग*
♻️ *आकर्षक काम*
♻️ *वैयक्तिक कामावर लक्ष*

🏠 *तसेच बांधकामविषयी इतर कोणत्याही कामासाठी सहकार्य !*

📱 *अधिक माहितीसाठी संपर्क करा :*

*श्री विसवटी कन्स्ट्रक्शन*
*मुकेश साळसकर*

*संपर्क :📱9405132939*
*📱9594043350*
*📱9405132939*

*पत्ता : साटमवाडी, बिडवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग*

*Advt link*

———————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा