*दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचे आयोजन*
सावंतवाडी हे संस्थानकाळापासून सांस्कृतिक वारसा असलेलं शहर…! शहराने सर्वप्रथम जिल्ह्यात नवरात्रोत्सव, सावंतवाडी महोत्सव असे कार्यक्रम सुरू केले आणि सावंतवाडी वासीयांच्या अमाप प्रतिसादामुळे सावंतवाडी शहराची “सांस्कृतिक वारसा जपणारे शहर” म्हणून राज्यभरात ओळख निर्माण झाली. आजही शहरात होणारे छोटे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम शहर वासीय मोठ्या उत्साहात साजरे करतात, उपस्थिती दर्शवितात.
शहरातील सांस्कृतिक वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री ना. दीपकभाई केसरकर मित्रमंडळाने उद्या दिनांक २६ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ठीक ७.०० वाजता केशवसुत कट्टा येथे “सांज पाडवा” या मनोरंजनात्मक संगीतमय सुरेल कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. वंद्यवृंदाच्या साथीने रंगणारा हा सांज पाडवा नक्कीच सावंतवाडीकरांसाठी अविस्मरणीय ठरणार यात शंकाच नाही.
दीपकभाई केसरकर मित्रमंडळातर्फे आयोजित सांज पाडव्याच्या कार्यक्रमास आपल्या उपस्थितीने चार चाँद लावण्यासाठी समस्त सावंतवाडीवासीयांना आग्रहाचे निमंत्रण आहे. तलावाच्या काठावर गुलाबी थंडीत रंगणाऱ्या कार्यक्रमाचा सर्व रसिकांनी नक्कीच आस्वाद घ्यावा.