You are currently viewing मातोंड येथे योग शिबिर संपन्न

मातोंड येथे योग शिबिर संपन्न

मातोंड येथे योग शिबिर संपन्न

वेंगुर्ला

पतंजली योग समिती सावंतवाडी यांच्या मार्फत व मातोंड गावचे सुपुत्र, निवृत्त केंद्रप्रमुख तथा योग मार्गदर्शक रावजी दुलाजी परब यांच्या प्रयत्नातून योग अभ्यास घराघरात पोचविणे व सर्वांचे जीवन निरोगी, आनंदी, समाधानी व समृद्ध बनविणे या उद्देशाने सहा दिवशीय योग शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात गावातील आबालवृद्धांनी सहभाग घेतला.

‘आपले आरोग्य, आपल्या हाती‘ या ब्रीदवाक्या अंतर्गत येथील श्री रामेश्वर मंदिरात हे योग शिबिर संपन्न झाले. १५ ते २० ऑक्टोबर या कालावधीत विविध योग प्रशिक्षकांच्या माध्यमातून सकाळी ५.३० ते ७.३० व सायंकाळी ६.०० ते ७.३० या वेळेत प्रशिक्षण देण्यात आले. तर या शिबिरात दैनंदिन जीवनात करावयाच्या योगांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचा समारोप २० ऑक्टोबर रोजी करण्यात आला. यावेळी पतंजली योग समिती सिंधुदुर्ग व पतंजली योग समिती सावंतवाडी पदाधिकारी यांची उपस्थिती व योग मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले. यावेळी उपस्थित पदाधिकारी महेश भाट, युवा प्रशिक्षक विद्याधर पाटणकर, योग मार्गदर्शक सुभाष गोवेकर, सर्वानंद दळवी, अनिल निखार्गे, तानाजी वरक, विकास गोवेकर, प्रकाश रेडकर, मनाली कोरगांवकर, रामनाथ सावंत, रावजी दुलाजी परब यांचा जेष्ठ काशीराम दत्ताराम परब (दादा म्हालटकर), कृष्णा घाडी, दीपक परब, राजन चव्हाण, निलेश नर्से यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सोसायटी संचालक दिपाली परब, माजी ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया मेस्त्री यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा