सिंधुदुर्ग
भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून चर्मकार समाजाच्या विद्यार्थी प्रश्न विषयी पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली यावेळी विद्यार्थी वस्तीगृह तसेच शालेय जातीभेद शिष्यवृत्तीधारकांवर होणारा अन्याय असे अनेक प्रश्नांवर निवेदन देऊन हे विषय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना सांगण्यात आले. यावेळी उपस्थित राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण मार्गदर्शक बबन चव्हाण नवी दिल्ली उपाध्यक्ष प्राजक चव्हाण राज्य सरचिटणीस अरुण होडावडेकर जिल्हा अध्यक्ष भारत तेंडुलकर जिल्हा उपाध्यक्ष बाबल पावसकर कार्याध्यक्ष खोटलेकर उपाध्यक्ष पंढरी पाताडे मालवण सचिव भूषण पाताडे कुडाळ सरचिटणीस मंगेश चव्हाण व समाजबांधव उपस्थित होते.