♦सिंधुदुर्ग सारख्या छोट्याशा जिल्ह्यात कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून जागतिक दर्जाचे आणि जगातील सर्वात उत्तम तंत्रज्ञान व सुविधा असणारे एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल अवघ्या दोन वर्षात उभे राहिले. नारायण राणे हे कोकणातील जिद्दी नेते, मनात ठरवतात, बोलतात ते पूर्ण करून दाखवतात. बोलल्याप्रमाणे सिंधुदुर्गातील लोकांची आरोग्य सुविधांसाठी होणारी गैरसोय लक्षात घेत त्यांनी स्वतःचे करोडो रुपये खर्चाचे हॉस्पिटल सुरू केले तसेच जिल्ह्यातच त्यासाठी डॉक्टर उपलब्ध व्हावेत, व कमीतकमी खर्चात लोकांना सुविधा मिळाव्यात म्हणून मेडिकल कॉलेजला मान्यता आणली. अल्पावधीतच स्वप्नवत असे हॉस्पिटल उभारले आणि जागतिक दर्जाच्या सुविधा सुरू केल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोचले.
♦चाचणी आणि कॅलिब्रेशन प्रयोगशाळेसाठी नॅशनल अक्रेडीएशन बोर्ड ऑफ लॅबोरेटरी (एन.ए.बी.एल.) कडून एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल मधील कोविड-१९ प्रयोगशाळेला मानांकन प्राप्त झाले आहे. एसएसपीएम च्या प्रयोगशाळेत अवघ्या ५ तासांत १०० नमुने तपासण्याची क्षमता आहे.
♦एनएबीएल मानांकन प्राप्त झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय परस्पर मान्यता कराराच्या या विकसनशील प्रणालीने अधिकृत मान्यता प्राप्त प्रयोगशाळेला इतर आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त करण्यास सक्षम केले आहे. तसेच एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मधील आरोग्यव्यवस्थेचा देशासहित जागतिक स्तरावर ठसा उमटविण्यास दिशानिर्देश दिला आहे.
♦एसएसपीएमची प्रयोगशाळा खाजगी तत्वावर सुरू असली तरी नारायण राणे यांनी जिल्ह्यातील लोकांची आर्थिक अडचण लक्षात घेत व जिल्ह्यातील जनतेने आजवर त्यांच्यावर केलेल्या प्रेमाखातर अत्यंत नाममात्र दरात कोविड-१९ ची तपासणी केली जात आहे. येथे कोविड-१९ स्वॅब तपासणी करण्याकरिता रुग्णांना मास्क व सॅनिटायझर वापरण्याची सक्ती केली जाते, इतर कोणत्याही अटीशर्ती लादल्या जात नाहीत.
♦कामगारांना त्यांचे रोजगार, व्यवसाय सुरू करण्यासाठी कोविड -१९ तपासणी प्रमाणपत्र व इतर राज्यात नोकरीसाठी लागणारे कोविड-१९ तपासणी अहवाल देखील एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देत आहेत.
♦सिंधुदुर्गातील कोणत्याही रुग्णाला शस्त्रक्रियेकरिता कोविड-१९ तपासणी अहवाल लागल्यास तो ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये रुग्ण असेल तिथे जाऊन त्या रुग्णाचे स्वॅब घेण्याची व्यवस्था रुग्णालयाकडून करण्यात येते.
♦जिल्ह्यात वाढत चाललेल्या कोरोनाच्या संकटात एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेचा सिंधुदुर्ग बरोबर शेजारील राज्यातील जिल्ह्यांनाही फायदा होणार आहे. भविष्यातही जिल्ह्यात उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी एसएसपीएम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज तत्पर आहे.
♦सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या वेळी देवासारखे धावून येणारे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे हे पुन्हा एकदा जिल्ह्यावासीयांसाठी देवदूत ठरले आहेत.