परतीचो पावस
हिरवे हिरवेगार मळे,
पिवळे धम्मक झाले,
सोन्यासारखे दाणे येवन,
केसरा डोलवक लागले.
पावसा…
आतातरी थांब रे…
भात कापूक लागताच,
ढग आभाळात भरले,
आंगाची कायली होवन,
घामाचे पाट व्होवले.
पावसा…
आतातरी थांब रे..
भाताचे आवे पसारले,
पानयात पेंडके पेवले,
जयंथंय उभ्या भाताक,
आडव्या पडान कोंब इले.
पावसा…
आतातरी थांब रे…
पाणी इला दारात,
पाणी लोकांच्या घरात,
पाणी भाताच्या खळ्यात,
पाणी भरला डोळ्यात,
पावसा…
आतातरी थांब रे…
(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६