सावंतवाडी
शिवतेज मित्रमंडळ सावंतवाडीच्या माध्यमातून शहरात नरकासुर स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. आक्राळ विक्राळ असे एकापेक्षा एक सरस नरकासुर या स्पर्धेत सहभागी झाले होते. कोरोनानंतर होणाऱ्या निर्बंध मुक्त स्पर्धेत नरकासुर मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. तर हजारोंच्या संख्येने सावंतवाडीकर मोती तलाव काठी उपस्थित होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दिपावलीच्या पुर्वसंध्येला सावंतवाडीकरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या दिवाळी गिफ्टची घोषणा करत शुभेच्छा दिल्या. मंत्री केसरकर यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये देव्या सुर्याजी, संतोष तळवणेकर, भाई शिर्के, हेमंत वागळे, संजू विर्नोडकर, मारूती निरवडेकर यांसह कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या योद्धांचा सन्मान करण्यात आला.
विविध मंडळांनी आक्राळ विक्राळ असे नरकासुर साकारले होते. यामध्ये चितार आळी बॉयज मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय झकास मित्रमंडळ वैश्यवाडा, तृतीय अनलादेवी कला क्रिडा मंडळ तेंडोली, कुडाळ यांनी प्राप्त केला. तर उत्तेजनार्थ आत्मेश्वर बाळगोपाळ मंडळ माठेवाडा, दळवीवाडा युवा कला क्रीडा मंडळ माजगाव यांनी प्राप्त केला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, दिलीप भालेकर, दत्ता सावंत, आबा सावंत, मंडळाचे अध्यक्ष विशाल सावंत, बाळकृष्ण सावंत, संजय कोरगावकर, राकेश कोचरेकर, प्रज्ञेश तावडे, प्रितेश आईर आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.