You are currently viewing भाजपा महीला मोर्चा च्या वतीने ” माता सुरक्षीत – घर सुरक्षीत ” या अभियान अंतर्गत शहरातील महीलांची तपासणी

भाजपा महीला मोर्चा च्या वतीने ” माता सुरक्षीत – घर सुरक्षीत ” या अभियान अंतर्गत शहरातील महीलांची तपासणी

वेंगुर्ले

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागा मार्फत संपुर्ण राज्यात महिलांसाठी तपासणी मोहीम हाती घेतली आहे . वेंगुर्ले तालुक्यातही आरोग्य केंद्रात तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी अशा तपासणी शिबीराचे आयोजन करुन महिलांसाठी समुपदेशनाचे काम करण्यात येत आहे .
शासनाच्या या उपक्रमात सहभागी होत भाजपा महीला मोर्चा ने वेंगुर्ले तालुका कार्यालयात अशाच प्रकारे महिला तपासणी शिबीराचे आयोजन केले होते .
तपासणी शिबिराची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली . यावेळी नगरसेवीका श्रेया मयेकर यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी व स्टाफचे गुलापपुष्प देऊन स्वागत केले .
यावेळी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ.स्वप्नाली माने – पवार , आरोग्य सेविका तांडेल मॅडम , आरोग्य सेवक एस्. एस्. झालबा , हिंद लॅबच्या निलिमा भाटकर , ग्रामीण रुग्णालयाचे डाॅ. श्रवण कुमार इत्यादी वैद्यकीय टीम ने सर्व महिला , माता व गरोदर स्त्रियांची मोफत तपासणी करून समुपदेशन केले .


यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अॅड सुषमा खानोलकर , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , नगरसेविका श्रेया मयेकर व साक्षी पेडणेकर , महिला ता.सरचिटणीस वृंदा गवडंळकर , रसीका मठकर , आकांक्षा परब , केतकी खवळे , सौ.मराठे इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा