You are currently viewing “आनंद शिधा” आजपासून ऑफलाईन मिळणार : मुख्यमंत्र्यांचे आदेश

“आनंद शिधा” आजपासून ऑफलाईन मिळणार : मुख्यमंत्र्यांचे आदेश

भाजपा कार्यकर्त्यांनी मानले आभार ; ऑफलाईन धान्य वितरणाची केली होती मागणी

मालवण

राज्य शासनाच्या वतीने यंदा दिवाळी सणाच्या निमित्त शासकीय रास्त धान्य दुकानांवरून १०० रुपयात उपलब्ध करून दिला जाणारा “आनंद शिधा” ऑनलाईन अडचणी असलेल्या ठिकाणी ऑफलाईन उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मालवण शहर भाजपच्या वतीने शनिवारी याबाबतची मागणी केली होती. याची पूर्तता झाल्या बद्दल भाजपा कार्यकर्त्यानी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. भाजपचे निवेदन प्राप्त झाल्यानंतर तातडीने प्रशासन पातळीवर पाठपुरावा करणाऱ्या मालवण तहसीलदार अजय पाटणे यांचे देखील आभार मानण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील जनतेला १०० रुपयांमध्ये ४ वस्तू देण्याचे धोरण ठरले आहे. त्यांच्या आनंद शिधा अद्याप पर्यंत मालवण तालुक्यात धान्य दुकानावर पोहोचलेला तसेच. तसेच सध्या ई-पॉस मशिनचा सर्व्हर डाऊन असल्याने तो आनंद शिधा सामान्य लोकांना दिवाळीत मिळणार नाही. तरी आपल्या स्तरावरुन तो शिधा ऑफलाईन वितरण करण्यास आदेश दिल्यास शासनाचा उद्देश सफल होईल. ऑनलाईन प्रोसेस प्रक्रिया पुढील महिन्यात करता येईल. त्यासाठी योग्य तो निर्णय घेऊन आनंद शिधा लवकरात लवकर जनतेपर्यंत पोहोचवावा, असे निवेदन मालवण शहर भाजपच्या वतीने काल निवेदनाद्वारे करण्यात आली होती.

या मागणीच्या अनुषंगाने तहसीलदार अजय पाटणे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून या निवेदनाचा विचार व्हावा, असे कळवले होते. राज्यात अन्यत्र ही या संदर्भात तक्रारी आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासनाने ज्या उद्देशाने हा शिधा उपलब्ध करण्यात आला आहे, तो उद्देश ऑनलाईन मुळे असफल होणार असल्याने ज्या ठिकाणी ऑनलाईन च्या अडचणी असतील, तेथे आनंद शिधा ऑफलाईन देण्याचा आदेश दिला आहे. याबाबत भाजपा पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा