मोबाईलमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी आणि फसवणूकीच्या प्रकारात वाढ:- सचिन हुंदळेकर

पोलीस स्मृतिदिन कार्यक्रम कासार्डे विद्यालयात संपन्न

तळेरे :-प्रतिनिधी

शहीद पोलिसांचे स्मरण व्हावे म्हणून 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून कासार्डे ज्यु. काॅलेज मध्ये आयोजित पोलीस स्मृतिदिन कार्यक्रमात
कणकवली तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन हुंदळेकर विद्यार्थ्यांशी मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर बोलताना म्हणाले की समाजामध्ये वाईट प्रवृत्ती दिवस दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतर्क राहिले पाहिजे.
मोबाईलमुळे मोठ्याप्रमाणात गुन्हेगारी आणि फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत.म्हणून निनावी
काॅल आला तर तो घेऊ नये व त्याला रिप्लायही देऊ नये, कारण त्यामुळे भविष्यात धोका होऊ शकतो. रस्त्यावरील अपघात होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी सक्तीने हेल्मेट वापरले पाहिजे असेही त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. कोणीही विनापरवान गाडी चालवू नये यामध्येच आपली खरी सुरक्षितता आहे. सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून रस्ते अपघात होऊ नये म्हणून रहदारीचे नियम अगदी काटेकोरपणे पाळावेत. व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यावर खोटे अकाउंट काढू नये. खोट्या अफवांना बळी पडू नये हाही मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.याशिवाय मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
संस्थेची कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर व प्राचार्य मधुकर खाड्ये यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या पोलिस स्मृतिदिन कार्यक्रम
प्रसंगी व्यासपीठावर प्रशालेचे पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर कुचेकर,पोलीस काॅनस्टेबल किरण मेटे डी.बी.देवरुखकर,
व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
अहोरात्र मेहनत घेणारे पोलीस कर्मचारी आहेत म्हणून आपण समाजामध्ये सुरक्षित राहत आहोत. सण- वार, उत्सव, कुटुंब नबघता ते समाजाची अहोरात्र सेवा बजावतात असे गौरवोद्गार विद्यालयाचे पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात काढले, ते पुढे म्हणाले की वाईट घटना घडल्यावर पश्चात्ताप करण्यापेक्षा ती घडू यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी.
आभार डी.बी.देवरुखकर यांनी मानले.

मोबाईलचे मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पो.नि.सचिन हुंदळेकर, सोबत कॉन्स्टेबल किरण मेटे, पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर व डी.बी देवरुखकर

प्रतिक्रिया व्यक्त करा