कणकवली
येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात आरोग्य विभाग, तालुका रुग्णालय आणि कणकवली महाविद्यालयातील महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले शासनाच्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानांतर्गत या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ.राजश्री साळुंखे, डॉ. विद्याधर तायशेटे व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, डॉ.विद्याधर तायशेटे, प्रा. युवराज महालिंगे, डॉ. धर्माधिकारी, डॉ.कदम, कणकवली रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, कणकवली महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या शिबिरात डॉ. राजश्री साळुंखे व डॉ. धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. राजश्री साळुंखे यांनी या उपक्रमाचे स्वागत करून महिलांचे आरोग्य , सकस आहार यांची सर्वांगीण माहिती उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी महाविद्यालयातील २३० विद्यार्थिनी व २२ प्राध्यापिका व अन्य उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी महिला विकास कक्षाच्या प्रा. मीनाक्षी सावंत, प्रा.मनीषा सावंत व महिला विकास कक्षातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.