You are currently viewing साळीस्तेतील गुरव कुटुंबियांना तातडीने शासकीय 4 लाखांची मदत

साळीस्तेतील गुरव कुटुंबियांना तातडीने शासकीय 4 लाखांची मदत

आमदार नितेश राणेंच्या सुचनेनंतर प्रशासनाची अतिशीघ्र हालचाल

तहसीलदार रमेश पवार यांनी सुपूर्त केला धनादेश

कणकवली

साळिस्ते गावात वीज पडून मृत्यु झालेले पांडुरंग नारायण गुरव यांच्या कुटुंबियांना आमदार नितेश राणे व कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांच्या पाठपुराव्यातून महाराष्ट्र शासनामार्फत चार लाख रुपयांच्या तातडीच्या आर्थिक मदतीचा धनादेश पांडुरंग गुरव यांच्या पत्नी प्रेमलता गुरव यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी जि.प. सदस्य बाळा जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, भाजपा बुथ कमीटी अध्यक्ष उदय बारस्कर, माजी सरपंच चंद्रकांत हर्याण, मयुरेश लिंगायत, जितेंद्र गुरव, दिनेश मुद्रस, राजा जाधव तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक महादेव बाबर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा