You are currently viewing भास्कर जाधव यांना सिंधुदुर्गात येण्यापासून कोणी ते अडवून दाखवावे – सतीश सावंत यांचे खुले आव्हान.

भास्कर जाधव यांना सिंधुदुर्गात येण्यापासून कोणी ते अडवून दाखवावे – सतीश सावंत यांचे खुले आव्हान.

भास्कर जाधव यांना सिंधुदुर्गात येण्यापासून कोणी ते अडवून दाखवावे -सतीश सावंत यांचे खुले आव्हान.

कणकवली

आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते आम. भास्कर जाधव यांच्या बद्दल असंसदीय शब्दात टीका केली. त्यांच्या विरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा. शिवसेना नेते आ. भास्कर जाधव पुन्हा आल्यास करेक्ट कार्यक्रम करू इशारा देणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावे भास्कर जाधव यांच्या उपस्थित कणकवलीचा शिवसेनेचा मेळावा होईल, लोकशाही मार्गाने आम्ही त्यांना पुन्हा आणून परफेक्ट कार्यक्रम करून दाखवू. तुमच्यात हिंमत असेल तर अडवून दाखवा असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला. प्रशोभक आणि असंसदीय विधाने करणाऱ्या आमदार नितेश राणे यांना जनताच जिल्ह्यात फिरू देणार नाही असेही सतीश सावंत म्हणाले.

कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देत आ. नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. आम. भास्कर जाधव यांचा पुतळा जाळत कोण धमकी देत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आमदार नितेश राणेंवर गुन्हा केव्हा दाखल करणार? ज्या पद्धतीने आ. भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा तातडीने दाखल केला. त्या पद्धतीने तातडीने गुन्हे दाखल करावेत, सरकार आले म्हणून कायदा हातात घेऊ शकत नाही. कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केली.
तर याबाबत शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये यांनी आम. नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा