सावंतवाडी :
आज 19 ऑक्टोंबर रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व सिंधुदुर्ग सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अमोल पावसकर यांच्या संयुक्त विद्यमानाने बाल रुग्णांचे मोफत सर्जरी शिबिर आयोजित केले होते.
यामध्ये बाल रुग्णांना लघवीचे त्रास, अपेन्डिस, हर्निया व थायमॉशीर तसेच इतर काही आजारांवर जवळपास तीन ते पाच वयोगटातील 13 बाल रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. या उपक्रमाला ग्रामीण भागातून प्रतिसाद मिळाला. कुडाळ, होडावडे, शिरोडा, परुळे ,उपवडे या ठिकाणावरून बाल रुग्ण आले होते.
श्रीमंत युवराज राजे यांच्या शुभ हस्ते फीत कापून उपजिल्हा रुग्णालयातील सुसज्ज अशा ऑपरेशन थेटरचा शुभारंभ करण्यात आला. युवराज यांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले व अशा प्रकारच्या उपक्रमांसाठी आपण नेहमीच आपल्या पाठीशी राहू जेणेकरून माझ्या जनतेची व रुग्णांची सेवा करण्याचे भाग्य मला लागले.
या पुढेही आपली काही मदत लागल्यास निसंकोच पणे सांगावे अशी भावना व्यक्त करून या उपक्रमासाठी डॉक्टरांना शुभेच्छा देऊन त्यांचं कौतुक हे केलं. सामाजिक बांधिलकीचे संजय पेडणेकर यांनी या सुसज्ज ऑपरेशन थिएटर बाबत एक सूचक विधान केले. हॉस्पिटलचे अधीक्षक व येथील डॉक्टर मंडळींनी या सुसज्ज अशा ऑपरेशन थेटरचा मेंटेनन्स अशाच प्रकारे नेहमीच व्यवस्थित ठेवावा.
तर डॉक्टर वज्राटकर सर यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व डॉक्टर मंडळींचे व रुग्णांच्या पालकांचे आभार मानले तसेच या हॉस्पिटलच्या अडीअडचणीसाठी सतत हातभार लावणारे जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व संजय पेडणेकर यांचेही आभार मानले. डॉ. अमोल पावसकर यांनी याही पुढे असे उपक्रम संयुक्तपणे राबवले जातील जेणेकरून गोरगरीब रुग्णांना सेवा मिळावी हा या उपक्रमाचा एकमेव उद्देश आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व संजय पेडणेकर, अजय गोंदावले, तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दुर्भाटकर सर, स्वरूप हॉस्पिटलचे डॉ. अमोल पावसकर, भूलतज्ञ डॉ. सूर्यवंशी, डॉ. संदीप सावंत, डॉ. महेंद्र आचरेकर, डॉ. विद्याधर ताई शेटे, डॉ.आदेश पालेकर, डॉ. सागर कोल्हे, डॉ.मुरली, डॉ.लादे डॉ. आकाश, डॉ. आदित्य, डॉ. विष्णू , डॉ. अवधूते, सिस्टर्स व हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होता.