You are currently viewing देवगडमध्ये आमदार नितेश राणेंचा शिवसेना ठाकरे गटाला धक्का

देवगडमध्ये आमदार नितेश राणेंचा शिवसेना ठाकरे गटाला धक्का

सरपंचांसह अनेक शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी केले प्रवेशकर्त्यांचे स्वागत

देवगड

सिंधुदुर्गात काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ रॅली काढत असतानाच शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न ठाकरे गटा कडून करण्यात आला. शिवसेनेचे नेते या मोर्चात सहभागी झाले. मात्र या मोर्चाच्या दुसऱ्या दिवशीच देवगड तालुक्यातील शिवसेनेच्या काही सरपंच व पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश शिवसेना ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आज देवगड मध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. देवगड तालुक्यातील शिवसेनेचे महत्त्वाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

यावेळी माजी आमदार अजित गोगटे तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर जिल्हा बँकेचे संचालक ऍड. प्रकाश बोडस भाजपा पदाधिकारी संदीप साटम प्रकाश राणे योगेश पाटकर दयानंद पाटील भाजपाचे नगरपंचायतीतील गटनेते शरद ठुकरूल उपस्थित होते.

प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पावणाई गावचे सरपंच गोविंद उर्फ पप्पू लाड, वानिवडे सरपंच प्राची प्रल्हाद घाडी, मधुरा मारुती घाडी ग्रामपंचायत सदस्य पावणाई, पावणाई गावचे उपसरपंच धनंजय दिनकर घाडी, पावणाई ग्रामपंचायतीच्या सदस्या कस्तुरी कल्पेश साटम, तळवडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व माजी सरपंच गणेश तुकाराम लाड, यांनी प्रवेश केला आहे. तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही यावेळी प्रवेश केला असून प्रल्हाद प्रकाश घाडी वानिवडे शाखाप्रमुख, विजय राम बाईत उपविभाग प्रमुख वानिवडे, रामचंद्र चंद्रकांत मासये शाळा व्यवस्थापन समिती पावणाई, शैलेश मधुकर घाडी वानिवडे उपशाखाप्रमुख, निलेश मनोहर राघव मनसे शाखा अध्यक्ष, अनिल यशवंत दळवी पावणाई शाखाप्रमुख, तसेच शिवसैनिक देवेंद्र लाड, प्रदीप लाड, अमित लाड, गौरव पाताडे, समीर लाड, बापू घाडी, वैभव घाडगे, दीपक प्रभू, चंद्रकांत घाडी, निलेश घाडी, यांनी प्रवेश केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा