*काव्य निनाद साहित्य मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.कविता किरण वालावलकर लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*डायरीतलं पान*
आज अचानक मला
डायरीत पान सापडलं
जुन्या अक्षरांनी पुन्हा
माझ्या मनाला गुंतवलं
हातात घेतल्यावर त्याला
मोरपंखी वाटला स्पर्श
भिरभिरले मी क्षणभर
क्षणांचा मनोहरी हर्ष
त्याला पाहिल्यावर मला
भुतकाळ आला भेटाया
लागला काळजाचा
चिंब भास स्पंदाळाया
डायरीतल्या पानाने
आठवला भूतकाळ
जोडली काळजाची
अशी सुखाशी नाळ
सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी कर्नाटक