इचलकरंजी/प्रतिनिधी –
संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान खात्यावर जमा झाले आहे. तर मंजूरी मिळूनही जून 2020, फेब्रुवारी 2021 व जुलै 2021 मधील लाभार्थ्यांचे प्रलंबित असलेले सर्व अनुदान दिवाळीपूर्वी प्रत्यक्षात खात्यावर जमा होणार आहे. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे कार्यासन अधिकारी प्रशांत वाघ यांनी जिल्हाधिकारी यांना आदेश पारीत केले आहेत. या प्रश्नी आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने लाभार्थ्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून निराधारांना दरमहा अनुदान दिले जाते. मागील काही महिन्यांपासून नियमित लाभार्थ्यांचे अनुदान प्रलंबित राहिले होते. तर जून 2020, फेब्रुवारी 2021 आणि जुलै 2021 मधील बैठकीत पात्र असून व मंजूरी मिळूनही हजारो लाभार्थी अनुदानापासून वंचित होते. या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थ्यांच्या मेळाव्यात दिवाळीपूर्वी सर्वच प्रलंबित अनुदान मिळवून देऊन लाभार्थ्यांची दिवाळी गोड करण्याचा शब्द आमदार आवाडे यांनी दिला होता. त्याची पूर्तता यानिमित्ताने झाली आहे. या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन शासनाने संपूर्ण राज्यातील लाभार्थ्यांसाठी महत्वापूर्ण निर्णय घेत सुमारे 2400 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार संगांयो लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असून लाभार्थ्यांच्या दिवाळीचा गोडवा आणखीन वाढला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी मंगळवारी केडीसीसी बँक शाखेत प्रत्यक्ष भेट देऊन लाभार्थ्यांची विचारपूस करत माहिती घेतली. त्याचबरोबर येथून पुढच्या काळात अनुदानात वाढ करण्यासह ते वेळेवर मिळण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे हे प्रयत्नशील राहतील, अशी ग्वाही दिली. यावेळ प्रकाश दत्तवाडे, अहमद मुजावर, राजू बोंद्रे, महेा पाटील, कोंडीबा दवडते, रमेश पाटील, अनिल शिकलगार, राहुल घाट आदी उपस्थित होते.
मागील अडीच वर्षापासून प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांचे थकीत अनुदान संदर्भात केलेल्या प्रयत्नांना यश लाभून शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना शासनाने वितरीत केलेल्या अनुदानातून थकबाकीची रक्कम दिवाळीपूर्वी आदा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रलंबित अनुदान दिवाळीपूर्वी बँक खात्यात जमा होणार आहे. शिवाय पोस्टात खाते काढण्यात आलेल्या लाभार्थ्यांना त्यांना थेट घरात अनुदान पोच होणार असल्याने लाभार्थ्यांनी गडबड व गर्दी करु नये, असे आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले आहे.
Advertisement
*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃
*💁♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔
*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*
*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*
*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*
*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘
*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️
*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*
🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*
*ऑफिस नं. 9637163129*
*Web link*
*————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*