You are currently viewing केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या प्रश्नावर शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळेचे अति आश्वासक उत्तर…

केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या प्रश्नावर शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळेचे अति आश्वासक उत्तर…

सावंतवाडी

सावंतवाडीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका कार्यकरिणीशी संवाद साधला. महाराष्ट्रात सत्ताबदल होऊन बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा युतीचे सरकार स्थापन झाले, त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्याशी चर्चा झाली.

सावंतवाडी शहर मतदारसंघात 18000 मतदार असल्याची अजय गोंदावळे यांनी नारायण राणे यांना सांगितले.”काय होईल मतदारसंघात?” असा केंद्रीयमंत्री नारायण राणें  यांनी  शहर मंडल अध्यक्ष गोंदावळे यांना प्रश्न विचारला.

केंद्रीय मंत्र्यांच्या प्रश्नावर अजय गोंदावळे यांनी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली.

त्यावेळी नारायण राणेंनी अजय गोंदावळे यांच्या उत्तरावर चपराक दिली.*”ते सोडून दे, काहीही झालं तरी काय होणार?” असा प्रतिप्रश्न राणे यांनी गोंदावळे यांना विचारला. आमचेच नगरसेवक जास्त येणार” असा विश्वास अजय गोंडावळे यांनी व्यक्त केला.

राज्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा युती असताना शहर मंडल अध्यक्ष स्वबळाची भाषा करतात याचे सर्वानाच यावेळी आश्चर्य वाटले.
सावंतवाडीचे भाग्यविधाते समजले जाणारे नाम.दीपक केसरकर राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री बनल्याने पुढे काय होते हे पाहणे सर्वांनाच औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा