आजी – माजी नगरसेवकांचे होणार स्नेहसंमेलन
कणकवली :
आज मंगळवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ रोजी कणकवली नगरपंचायतीला २० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्त कणकवली नगरपंचायतच्या आजी-माजी नगरसेवक व कर्मचारी यांचे स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले आहे. तरी आज मंगळवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ रोजी सायं. ४ वा. नगरवाचनालय हॉल येथे सोहळा होणार आहे. तसेच यावेळी कर्मचाऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी केले आहे.