You are currently viewing डाॅ.श्री.चन्द्रकांत सावंत सर यांच्या शैक्षणिक समाजकार्याची नोंद VICTORIOUS INTERNATIONAL BOOK OF RECORDS 2022 मध्ये..

डाॅ.श्री.चन्द्रकांत सावंत सर यांच्या शैक्षणिक समाजकार्याची नोंद VICTORIOUS INTERNATIONAL BOOK OF RECORDS 2022 मध्ये..

 

शैक्षणिक यशस्वितेत मानांकित सन्मानाची भर

भारतभूषण , राष्ट्रीय समाजरत्न सन्मानित डाॅ.श्री.चन्द्रकांत सावंत सर आंबोली ( गावठणवाडी ) सिंधुदुर्ग महाराष्ट्र DOCTOR OF EDUCATION , PHILOSOPHY & LITERATURE
पदवीधर शिक्षक , जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा , मठ नं. 2 ता. वेंगुर्ला तथा माजी मुख्याध्यापक जि.प. सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा , फणसवडे ता. सावंतवाडी.
2019 पासून आजपर्यंत सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जि.प. सिंधुदुर्ग प्राथमिक व उच्च प्राथमिक 70 शाळांमधील 94 व माध्यमिक 5 हायस्कूलमधील 25 विद्यार्थीनी मिळून एकत्रित 75 शाळांमधील 119 विद्यार्थीनी दत्तक घेतलेल्या आहेत. या विद्यार्थीनी निहाय संबंधित शाळांमध्ये देणगीरूपात कायमस्वरूपी स्वरूपात जमा केलेली रक्कम व सदर रक्कम कायमस्वरूपी तशीच रहाणार आहे. या रकमेवर दरवर्षी मिळणारे व्याज हे दरवर्षी 119 विद्यार्थीनींना शैक्षणिक सहकार्य रूपात मिळत रहाणार आहे व याप्रमाणेच कालांतराने हे सहकार्य हजारो मुलींना मिळत रहाणार आहे. हे कायमस्वरूपी मिळत रहाणारे शैक्षणिक सहकार्य आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम भागातील फणसवडे गावात व्यवस्थापक मार्गदर्शक म्हणून कार्य करत श्री देव मल्नाथ महिला बचत गटांची स्थापना केलेल्या व विशेष दिपावली भेट देत केलेले कर्जमुक्त सहकार्य तसेच आजपर्यंत करत असलेल्या शैक्षणिक समाजकार्याची नोंद VICTORIOUS INTERNATIONAL BOOK OF RECORDS 2022 मध्ये करण्यात आलेली आहे. सदर बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड सन्मा. निवड समितीकडून संबंधित कार्याची नोंद Selection & Certified करण्यात आली.
तसेच सदर शैक्षणिक समाजकार्याची नोंद OMG BOOK OF NATIONAL RECORDS 2022 , GENIUS BOOK OF WORLD RECORDS 2022 , FOREVER STAR BOOK OF WORLD RECORDS 2022 मध्येही करण्यात आलेली आहे.त्यांचे
हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि भावी शैक्षणिक सामाजिक कार्य, वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 5 =