वेंगुर्ले :
वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय ग्राम तपासणीने भेट देऊन पाहणी केली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्पर्धेत कोकण विभागात द्वितीय आलेल्या परुळेबाजार ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय समितीने भेट देऊन पाहणी करून अभियानांतर्गत कामाचे मुल्यमापन केले.
या समितीत राज्यस्तरीय समिती मंत्रालय मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे, सदस्य बाळासाहेब हजारे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबईचे कक्ष अधिकारी रमेश पात्रे यांनी पाहणी केली. समितीचे स्वागत सरपंच श्वेता चव्हाण, उपसरपंच मनिषा नेवाळकर, सर्व ग्रा.पं. सदस्य यांनी केले. यावेळी उप मुख्यकार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर, स्वच्छता विभाग सिंधुदुर्गचे श्री मठकर, विस्तार अधिकारी संदेश परब, माजी सरपंच प्रदिप प्रभु, पुरुषोतम प्रभु, प्राजक्ता चिपकर, प्रणिती आंबडपालकर, ग्रापं सदस्य सुनिल चव्हाण, शांताराम पेडणेकर, अदिती परुळेकर, प्रणिता तांडेल, ग्रामसेवक शरद शिंदे, ग्रामसेवक मंगेश नाईक, स्वच्छता विभाग पं.स.च्या अक्षता नाईक, निर्मला परब, महीला व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी समितीने अभियानांतर्गत केलेल्या कामांची व उपक्रमांची पाहणी केली. यात कचरा संकलन प्रक्रिया, गांडुळ खतप्रकल्प, वैयक्तीक सार्वजनीक शौचालये, पाणी उद्भव समस्या, समाजमंदिर सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प यांची पाहणी केली. यावेळी अधिकारी यांनी ग्रामपंचायतीच्या स्वच्छतेच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.