You are currently viewing झरे २ आणि पाटये पुनर्वसन ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व

झरे २ आणि पाटये पुनर्वसन ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील झरे – २ व पाटये पुनर्वसन या दोन ग्रामपंचयातच्या निवडणुका काल पार पाडल्या होत्या. यामध्ये सरपंच पदी झरे-२ मधून श्रुती देसाई हया ८६ मतांनी निवडून आल्या तर पाटये पुनर्वसन सरपंच पदी प्रविण गवस हे २१ मतांनी निवडून आले चुरशीच्या निवडणूकीत भाजपने बाजी मारली आहे.थेट तहसील कार्यालया समोर सूक्ष्म लघु मध्यम केंद्रिय उद्योगमंत्री नारायणराव राणे भाजपा कार्यकर्ते व नूतन सरपंच यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. दोन्ही गाव तिलारी आंतर राज्य प्रकल्प बाधीत गावाचे पुनवर्सन क्षेत्रातील असून या ठिकाणच्या या ग्रा. पं. निवडणुकीसाठी थेट सरपंच व सदस्य पदासाठी काल मतदान प्रक्रिया पुर्ण झाली होती यापूर्वी झरे २ मधील प्रभाग तर पाटये पुनर्वसन मध्ये केवळ एक सर्वसाधारण स्त्री सदस्य बिनविरोध निवडुन आली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा