नितेश राणे यांसकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर
कणकवली
कणकवली तालुक्यातील साळीस्ते या गावी दि. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी पडलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने विजांच्या कडकडाटाने वीज अंगावर पडून दुर्दैवी जागीच मृत्यूमुखी झालेल्या कै.पांडुरंग मारूती गुरव यांच्या घरी नुकतीच भाजपा आमदार नितेश राणे यांनी कुटुंबियांची भेट घेतली व त्या कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच अंगावर वीज पडून गंभीर जखमी झालेले याच गावातील रहिवासी मारुती गुरव यांच्या घरी देखील जाऊन त्यांच्या आजारपणाची चौकशी करून त्यांना देखील तातडीने आर्थिक मदत जाहीर केली. जि.प.सदस्य रवींद्र जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, बुथ कमीटी अध्यक्ष उदय बारस्कर, उपसरपंच बाळासाहेब पाटिल, चंद्रकांत हर्याण, मयुरेश लिंगायत, प्रशांत बारस्कर,जितेंद्र गुरव ,सचिन ताम्हणकर, नरेश ताम्हणकर, पप्या मेस्री,मंगेश कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते. सिंधुदुर्गात पडलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या असून कणकवली तालुक्यातील साळीस्ते गावात अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झालेले पांडुरंग नारायण गुरव याच्या कुटुंबियांना आमदार नितेश राणे यांनी तातडीची मदत जाहीर केली.
परतीच्या मुसळधार पावसात वीज पडून मृत्यूमुखी पडलेले साळीस्ते येथील पांडुरंग नारायण गुरव यांच्या कुटुंबांयांची आमदार नीतेश राणे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. राणे यांनी गुरव कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत केली. यावेळी त्यांनी तेथीलच मारूती गुरव यांच्या घरी जाऊन आजारपणाची चौकशी करत आर्थिक मदतही केली. याप्रसंगी जि. प. सदस्य बाळा जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, बुथ कमीटी अध्यक्ष उदय बारस्कर, उपसरपंच बाळासाहेब पाटिल, चंद्रकांत हर्याण, मयुरेश लिंगायत, प्रशांत बारस्कर, जितेंद्र गुरव, सचिन ताम्हणकर, नरेश ताम्हणकर, पप्या मेस्री, मंगेश कांबळे आदी उपस्थित होते.