You are currently viewing अ‍ॅन्टी करप्शनच्या विरोधात काढण्यात येणार्‍या विराट मोर्च्याला जिल्हा राष्ट्रवादीचा पाठिंबा – अमित सामंत

अ‍ॅन्टी करप्शनच्या विरोधात काढण्यात येणार्‍या विराट मोर्च्याला जिल्हा राष्ट्रवादीचा पाठिंबा – अमित सामंत

कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन…

सावंतवाडी

आमदार वैभव नाईक यांना नोटीसा बजावणार्‍या “अ‍ॅन्टी करप्शन” च्या विरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुकारण्यात आलेल्या विराट मोर्चाला जिल्हा राष्ट्रवादीचा जाहीर पाठींबा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यानी या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदूर्ग राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज येथे केले. ते याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी ते म्हणाले , या ठीकाणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना चुकीच्या पध्दतीने नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. हा प्रकार योग्य नाही, आणि त्या विरोधात महाविकास आघाडीने १८ तारखेला अ‍ॅन्टी करप्शन कार्यालयाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आमचा जिल्हा राष्ट्रवादी म्हणून पाठींबा आहे, असे ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा