You are currently viewing राहुल गांधींच्या यात्रेची जबाबदारी सिंधुदुर्गात काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष विकास सावंतांकडे…

राहुल गांधींच्या यात्रेची जबाबदारी सिंधुदुर्गात काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष विकास सावंतांकडे…

सावंतवाडी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात यशस्वी करण्यासाठी जिल्हानिहाय जबाबदारी निश्चित करण्यात आली असून कोकण विभागातील नेत्यांना देखील जबाबदारी देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष विकास सावंत यांचे नाव या यादीत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत छोडो यात्रा सुरू केली असून ती यशस्वी होण्यासाठी प्रत्येक राज्यातून प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये देखील भारत जोडो यात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्हानिहाय निवड करण्यात आली आहे. कोकण विभागांमध्ये देखील भारत जोडो यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला जबाबदारी देण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून काँग्रेसचे माजी अध्यक्ष विकास सावंत यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
ठाणे ग्रामीण व भिवंडी मधून सुभाष कानडे, रत्नागिरी मधून श्रीमती हुस्नबातो खलीपे, नवी मुंबई पनवेल मधून रमाकांत म्हात्रे, ठाणे शहर मधून मनोज शिंदे, कल्याण ब्रिजकीशोर दत्त, रायगड मधून प्रवीण ठाकूर ,पालघर वसई मधून विजय पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा