*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी विनायक जोशी यांची अप्रतिम काव्यरचना*
*कुस्करू दे चेहेरा* @
हिरवळ उगवली तुझ्या रूपाने
नको अशी तू *हंसू*
हिरवा शालू उठून दिसतो
आंत नको गं *बसू*
तुझ्या गालीची खळी दिवाणी
*वाकुल्या* मज लाविते
दंत पंगती अशी *खुणविते*
*गाली* मज रूतते
एक दिवाणी इथे भेटली
कुणा कसे मी *सांगू*
बट केसांची काळी कुरळी
लागे गालावर *रांगू*
ओठ जास्वंदी चुरून पाकळ्या
दाविती मज *वाकुल्या*
निळ्या बांगड्या वाजवून दाविशी
हंसती गालावरच्या *खळ्या*
पदर काढून डोक्यावरचा
वारा मज घालशी
मिशी टोचता चंद्रमुखाला
मान गरकन वळवशी
नको होऊ तू दूर अशी
बस की मज शेजारी
शेजेवरती पडून आडवी
कुशीत ये सत्वरी
काल दिशीचा उपास सोडू
माळून तूज *गजरा*
मालव दिवा तो शेजे बाजूचा
*कुस्करू दे चेहेरा*
वि ना य क. जो शी
❤️✍🏻 ९३२४३२४१५७