*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ शोभा वागळे लिखित अप्रतिम कथा*
*भाग्योदय*
श्रीधर समुद्र किनाऱ्यावर एकटाच फेऱ्या मारत होता. जवळ जवळ महिना होत आला, पदवी मिळवली पण नोकरी मिळणे कठीण झाले होते. आज या ठिकाणी तर उद्या दुसरीकडे सारख्या मुलाखती देत होता. वशिलेबाजी सगळीकडे असल्याने होतकरू माणसांना त्रास सहन करावा लागत होता. श्रीधरचीही स्थिती काही वेगळी नव्हती. नोकरी करता त्याची वणवण आई बाबांना बघवत नव्हती. बाबांनी आपल्या फंडाचे पैसे त्याला देऊ केले होते आणि हवं तर तुझा बिजनेस कर म्हणून सांगितले होते. पण श्रीधरला ते पटत नव्हते. अगोदर नोकरी करून नंतर बिजनेसचे बघावे असे त्याचे मत होते. आजची मुलाखत खूप छान झाली होती. पगार सुद्धा मनासारखा देणार होते. उद्यापासून ऑफिस जॉईन करा, असे ही साहेबांनी सांगितले होते. तेवढ्यात साहेबांचा फोन वाजला. मुलाखतीतून एकाची निवड झाली हे ही त्यांनी समोरच्याला सांगितले. पण समोरची व्यक्ती बहुतेक ऐकायलाच तयार नव्हती व साहेब फक्त हं हं करत होते. फोन बंद करून ते पाणी प्यायले व थोडावेळ शांत बसले. त्यांचा चेहरा पडला होता. ते करूण स्वरात बोलले, “मी नोकरीचं तुम्हाला नंतर कळवतो.”
“काय झालं सर? मला आशेवर ठेऊ नका. सरळ सांगा. गेले महिनाभर मुलाखती देत आहे मी. खूप अनुभव घेतलाय. वरून आदेश आला ना?”
“आय एम रिअली सॉरी. आय एम हेल्पलेस.”
“ओके सर, नो प्रॉब्लेम,” असे म्हणून श्रीधर उठला आणि सरळ जुहू बीचवर आला.
इकडून तिकडे तो सारख्या फेऱ्या मारत होता. आता अंधार व्हायला लागला होता. बीचवरची गर्दी हळूहळू ओसरू लागली होती. समुद्रालाही भरती चढत होती. माणसांची रहदारी ही कमी होत होती. एवढ्यात “वाचवा! वाचवा! माझ्या मुलाला वाचवा!” अशी किंकाळी त्याच्या कानांवर पडली आणि तो भानावर आला. आवाजाच्या दिशेने तो धावत गेला तर तिथे एक बाई पाण्याकडे हात दाखवून सारखी रडत होती. मागचा पुढचा विचार न करता श्रीधर पाण्याच्या दिशेने धावला. पाण्यात कुणीतरी गटांगळ्या खात आहे हे लांबून त्याला दिसले. लाटांबरोबर बुडणारी व्यक्ती ही हेलकावे खात वर खाली होत होती. तरी जिवाच्या आकांताने तो पाण्यातून वाट काढत पुढे गेला आणि महा प्रयत्नाने त्या मुलाला त्याने किनाऱ्यावर आणले. तो पर्यंत जीवरक्षकही तिथे आले होते. मुलाची शुद्ध हरपली होती. पाणी ही पोटात गेलं होतं. सर्वांनी मिळून त्याला उलथा झोपवून पाठीवर कमरेवर दाबून पाणी बाहेर काढले. मुलाचे प्राण वाचले होते.
त्या बाईंनी श्रीधरचे मनापासून आभार मानले. त्याला ती पैसेही देऊ लागली पण श्रीधरने ते घेतले नाहीत. एव्हाना त्या मुलाचे वडील ही तिथे आले. आज एवढ्या मोठ्या संकटातून आपल्या मुलाला वाचवले म्हणून त्यांनी श्रीधरचे पाय धरले आणि श्रीधरची जुजबी चोकशी केली. श्रीधरने ही थोडक्यात त्याची सध्य परिस्थिती सांगितली. त्या बरोबर त्या माणसाने श्रीधरला आपले कार्ड दिले, त्याचाही नंबर घेतला व उद्या माझ्या ऑफिसमध्ये येऊन भेट असे सांगितले.
कार्ड घेऊन श्रीधर घरी परतला. रोजच्याच नकाराची सवय झाल्याने कुणी त्याला काही विचारत नसत. आईने त्याला चहा दिला. चहा पित असताना बीचवर घडलेला प्रसंग त्याने आईला सांगितला. त्याची आई ही घाबरली. “बाळा, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता धावलास! देव पावला बाई.” असं म्हणून तिने देवापुढे बत्ती लावून साखर ठेवली. “माझ्या पोराला सुखी ठेव देवा”, अशी विनवणी केली.
व्हिजिटिंग कार्ड दिले आहे म्हणजे श्रीधर उद्या तिथे जाईल असे घरच्यांना वाटले होते. पण श्रीधर कुठेच गेला नाही. त्यालाही कुणी विचारले नाही. दुसऱ्या दिवशी त्याच माणसाचा श्रीधरला फोन आला आणि त्याला त्यांनी घरी बोलावले. त्यांनी एक लहानशी पार्टी ठेवली होती आणि त्या पार्टीला त्याच्या घरच्या सगळ्यांना आग्रहाने बोलावले होते.
सगळ्यांना बोलावले असले तरी श्रीधर एकटाच गेला. पार्टीला सगळे मोठ मोठे उद्योगपती आले होते. त्या सगळ्यांशी ते श्रीधरची ओळख करून देत होते. त्या पाहूण्यांमध्ये श्रीधरची त्या दिवशी ज्यांनी मुलाखत घेतली होती ते सर ही आले होते. त्यांनी जमलेल्या सगळ्यांना मुलाखतीची गोष्ट सांगितली आणि म्हणाले, “बरं झालं मी त्या दिवशी श्रीधरला नोकरी दिली नाही. मी दिली असती, तर श्रीधर बीचवर गेलाच नसता. जे होते ते चांगल्या साठीच.” त्या लहान मुलाची आई, ही त्या मुलाखत घेतलेल्या सरांची बहीण होती असे तेव्हा श्रीधरला समजले. तिनेच फोन करून आपल्या मैत्रिणीच्या मुलाला ती नोकरी द्यावी अशी आपल्या भावाला गळ घातली होती. म्हणूनच श्रीधरच्या तोंडाशी आलेला घास तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या गळी घातल्याने श्रीधरला नकार दिला गेला होता. म्हणून दुःखी झाल्याने श्रीधर बीचवर गेला होता आणि त्याचे भाग्य उदयाला आले.
जेव्हा त्या बाईला ही गोष्ट कळली तेव्हा तिने आपल्या भावाला श्रीधरलाच नोकरीवर ठेवायला सांगितले. तेव्हा त्या मुलाचे वडील म्हणाले, “काही नको तिथे जायला. मी त्याची नोकरी फिक्स केली आहे. त्याच्या शिक्षणाचा माझ्याच कंपनीला खूप उपयोग होईल. त्याच्या सारखा प्रामाणिक आणि स्वाभिमानी माणूस माझ्या कंपनीला हवा आहे. श्रीधर, मला तुझी मुलाखत घ्यायची गरज नाही. उद्या पासून तू माझ्या कंपनीत मॅनेजरच्या जागेवर काम करशील. तुझे काम व प्रगती पाहून मी तुला त्याहुन मोठी पोस्ट देईन. शेवटी ते सर्व तुझ्या मेहनतीवरच आहे. चला, आता माझ्या मुलाच्या पुनर्जन्माच्या पार्टीचा आनंद घेऊया. चल श्रीधर, आजच्या पार्टीचा केक माझ्या मुलाचा हात धरून तू कापायचा.” असे म्हणून सगळे केकच्या टेबलाकडे गेले व टाळ्यांच्या कडकडाटात केक कापला गेला.
दुसऱ्या दिवशी श्रीधर त्यांच्या कंपनीत गेला. त्याला कामाची माहिती सांगितली गेली. सांगितल्याप्रमाणे श्रीधरने सर्व व्यवहार नीट हातळले. आठ दिवसातच त्याने आपले कौशल्य दाखवून दिले. वेळेवर येणे, नीट काम करणे, नवीन कार्य शिकण्याची जिज्ञासा ह्यामुळे सहा महिन्यातच श्रीधरने विलक्षण प्रगती केली. त्याचा उमदा स्वभाव व काम पाहून साहेबांनी मोठ मोठ्या जबाबदाऱ्या त्याच्यावर टाकल्या व त्या सर्व त्याने यशस्वी करून दाखवल्या. पुढच्या सहा महिन्यात कंपनीच्या बहुतांश जबाबदाऱ्या श्रीधरच सांभाळू लागला.
बुडत्या मुलाला वाचवल्याच्या कारणाने श्रीधरचे भाग्य उदयाला आले. जीवनात निराश होऊन उपयोग नाही. भाग्यरेषा कधी केव्हा बदलून भाग्य उजळेल सांगता येत नाही. थोढा संयम बाळगावा व आपला स्वाभिमान व प्रामाणिकपणा जपावा. शेवटी देवावर विश्वास ठेवावा.
*समाप्त*
शोभा वागळे
मुंबई.
8850466717
*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃
*💁♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔
*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*
*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*
*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*
*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘
*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️
*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*
🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*
*ऑफिस नं. 9637163129*
*Web link*
*————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*