You are currently viewing लो. टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी डबल डेकर एक्सप्रेस चार अनुकूलित डबे वाढवण्याचा निर्णय

लो. टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी डबल डेकर एक्सप्रेस चार अनुकूलित डबे वाढवण्याचा निर्णय

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

 

दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन या मार्गावरून धावणाऱ्या दोन्ही डबल डेकर एक्सप्रेस गाड्यांना प्रत्येकी चार अनुकूलित डबे वाढवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी डबल डेकर एक्सप्रेस ११०९९ / १११०० वातानुकूलित थ्री टायर श्रेणीचे चार डबे, तर ११०८५ / ११०८६ या दुसऱ्या डबल डेकर एक्सप्रेस ला वातानुकूलित थ्री टायर श्रेणीचे चार अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत. त्यामुळे या दोन्ही डबल डेकर एक्सप्रेस 16 डब्यांच्या धावणार आहेत. रेल्वेने दिलेल्या ११०९९ या गाडीला हा बदल १५ ते २९ ऑक्टोंबर दरम्यान दर शनिवार साठी तर १११०० या गाडीसाठी १६ ते ३० ऑक्टोंबर या कालावधीत रविवार साठी राहणार आहे. त्याचबरोबर ११०८५ या गाडीसाठी हा बदल १७ ते ३१ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीसाठी सोमवार तसेच मंगळवारी धावणाऱ्या डबल डेकरला लागू असेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा