भाजपा युवा नेते विशालजी परब यांचा वाढदिवस विवीध उपक्रम हाती घेऊन जिल्हाभरात साजरा होत असताना .आज कसाल मध्ये शेकडो दिंव्यागांच्या सोबत केक कापून साजरा करण्यात आला .
जागतिक पांढरी काठी दिनानिमीत्त भाजपा दिंव्याग विकास आघाडी च्या वतीने कसाल येथील सिद्धिविनायक हाॅल मध्ये दिव्यांगांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता . याच कार्यक्रमात विशाल परब यांच्या हस्ते अंधांना पांढरी काठीचे वाटप करण्यात आले. तसेच सर्व दिव्यांगांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस उस्ताहात साजरा करण्यात आला .
यावेळी दिव्यांगांना मार्गदर्शन करताना विशाल परब म्हणाले की भविष्यात दिव्यांगांना कोणतीही अडचण आली तर आपण मदत करू . तसेच केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेबांच्या माध्यमातून खादी ग्रामोद्योग विभागामार्फत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले . तसेच भविष्यात दिव्यांगांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .
यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , भाजपा दिंव्याग विकास आघाडी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे , जिल्हा सरचिटणीस शामसुंदर लोट , चिटनीस सुनील तांबे , दिक्षा तेली , स्वाती राऊळ , संगीता पवार , रविंद्र शिरसाठ तसेच जिल्ह्यातील २२५ दिंव्याग उपस्थित होते .