You are currently viewing हात तुझा हातात आणि धुंद ही हवा

हात तुझा हातात आणि धुंद ही हवा

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या.. कथाविश्र्व समूह प्रशासिका लेखिका कवयित्री सौ.अचला धारप, रोहा लिखीत अप्रतिम ललीतलेख*

निळ्या नभांगणात तेज शिंपित तो चंद्र अवतरतो..त्याचा तो शीतल प्रकाश..त्याच ते ओज! आहा ! जशी जशी यामिनी बहरते तस या चंद्राला तेज चढत जातं…हा चंद्र तेजःपुंज दिसतो. अगणित चांदण्यांची नभांगणात चंद्राभोवती रासक्रिडा रंगते. जणुकाही कृष्णाभोवती गोपिकांनी फेर धरलाय..
ते काळे सावळे मेघ त्या चंद्राला मधेच स्पर्श करायला जातात जणू काही सोनचाफ्याचा फूल हातात घेतली की ओंजळ सुगंधी होते तसच त्या नभांना वाटत होतं की चंद्राच्या स्पर्शाने आपल्याला पण तेज येईल. म्हणून ते ढग चंद्राबरोबर पळत होते..तो झाकोळलेला चंद्र किती छान दिसतो.हा सोहळा जरी आकाशात रंगत असला तरी अवनीवरचे लोकही या कोजागिरी पोर्णिमेसाठी तेवढेच उत्सुक असतात.
शरदाचे चांदणे शिंपित आलेली ही रात्र…अशा टिपुर चांदण्यात सागर किनारी फिरण्याची मजा न्यारी!
समुद्राला आलेली भरती….
त्या एकामागोमाग एक एकमेकांवर धडकणा-या लाटा…. तो सु..सु… करत घोंगावणारा वारा……
अशावेळी निवांतपणे त्या सागर किनार्‍यावर तो आणि मी करकमळ एकमेकांच्या हातात गुंफत हलवत मस्त किनार्‍यावरुन गुजगोष्टी करत फिरत होतो
सागर किनार्‍यावरची ती वाळू…तिचा तो स्पर्श..
त्या आकाशातल्या चंद्राचे ते समुद्राच्या लाटांवरच प्रतिबिंब न्याहळत असताना तू आनंदाने
‘हात तुझा हाती ‘ म्हणत समुद्राच्या पाण्यात त्या लाटांबरोबर खेळायला कधी घेऊन गेलास ते कळलच नाही.
त्या लाटांचे तुषार अंगावर रोमांच उभे करत होते.मनात सुद्धा आनंदाची कारंजी थुईथुई करत होती. हातात हात घालून निवांत त्या लाटांबरोबर समुद्र किना-यावर किती वेळ चालतोय त्याच भानच राहील नाही.
*चंद्र आहे साक्षीला* म्हणत तू त्या
किनार्‍यावर बोटाने त्या वाळूवर बदाम काढून त्या मधे नाव लिहून I Love you लिहून त्या अथांग सागराच्या साक्षीने प्रेम व्यक्त केलेस.
हळूच जवळ घेत माझ्या मुखावरचा चंद्रमा तू हातात घेत हळूच तुझ्या अधरांनी स्पर्श केलास.मी एकदम मोहरून गेले.तुझ्या त्या प्रेमाच्या चांदण्यात न्हाऊन निघाले आणि त्या वेळी माझ्या मनात आल…
*हात तुझा हातात आणि धुंद ही हवा*
*रोजचाच चंद्र आज भासतो नवा*

सौ.अचला धारप, रोहा.

Advertisement

*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*

*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*

*_👨‍👩‍👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*

*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*

*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*

*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*

*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*

*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*

*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*

*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*

*🏃🏻‍♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*

*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*

*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*

*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*

*Advt link*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा