You are currently viewing औरंगाबादमध्ये ५ व ६ नोव्हें-ला राज्य सब ज्युनिअर चॅम्पियनशिप व राष्ट्रीय निवड चाचणी कराटे स्पर्धा

औरंगाबादमध्ये ५ व ६ नोव्हें-ला राज्य सब ज्युनिअर चॅम्पियनशिप व राष्ट्रीय निवड चाचणी कराटे स्पर्धा

तळेरे – प्रतिनिधी

 

कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कराटे अजिंक्य पद स्पर्धेचे आयोजन दि. ५ व ६ नोव्हेंबर२०२२ रोजी गारखेडा औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलन येथे करण्यात आले आहे अशी माहिती संघटनेचे महासचिव सिहान संदीप गाडे व सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

तत्पूर्वी कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या सर्व जिल्हा सदस्यांनी आप आपापल्या जिल्ह्यातील सब ज्युनिअर खेळाडुंची निवड चाचणी घेऊन विजेत्या स्पर्धकांना या राज्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्य संघटनेकडे कागदोपत्री पुरतता करावी असे संदीप गाडे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रशिक्षकांना आवाहन यामाध्यमातून केले आहे.

ही स्पर्धा कॉमन वेल्थ कराटे फेडरेशन(CKF), साऊथ एशियन कराटे फेडरेशन(SAKM), वर्ड कराटे फेडरेशन(WKF) व इंटरनॅशनल ओलंपिक कमिटी(IOC) यांच्याशी संलग्न असलेल्या कराटे इंडिया ऑर्गनायझेशन(KIO) मान्यतेने संपन्न होणार आहे.

तरी या राज्य सब ज्युनिअर कराटे स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी www.karate maharashtra.in याठिकाणी अथवा

आमचे KAM चे जिल्हा प्रतिनिधी तथा सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड तसेच राज्य महासचिव सिहान संदीप गाडे मोबा.९८९२१५२१९७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा