You are currently viewing जिल्ह्यामध्ये युनिक अकॅडमी कणकवलीतून जास्तीत जास्त अधिकारी घडतील आणि राज्यासह देशाचे नेतृत्व करतील – तहसीलदार मा. रमेश पवार

जिल्ह्यामध्ये युनिक अकॅडमी कणकवलीतून जास्तीत जास्त अधिकारी घडतील आणि राज्यासह देशाचे नेतृत्व करतील – तहसीलदार मा. रमेश पवार

कणकवली

आपल्या जिल्ह्यातील विविध खात्यांमध्ये सरकारी पदावर युनिक चे अधिकारी कार्यरत आहेत असेच जास्तीत जास्त अधिकारी युनिक कणकवलीतून घडतील आणि राज्य आणि देशाचे नेतृत्व करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव मोठे करतील असा आशावाद कणकवली तहसीलदार मा. रमेश पवार यांनी युनिक अकॅडेमीच्या नवीन जागेतील उदघाट्न प्रसंगी व्यक्त केला.

यावेळी युनिक कणकवलीचे संचालक सचिन कोर्लेकर, नरडवे हायस्कुल चे निवृत्त मुख्याध्यापक कुंभार सर, इंडस हेल्थ प्लस या आरोग्य संस्थेचे सत्यवान मडवी, गुरुकुल क्लासचे प्रमुख दत्तात्रय केसरकर, चैतन्य क्लासचे प्रमुख अच्युत देसाई,फ्लोरेट कॉलेज च्या सार्था कदम, मनीषा देसाई, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
मा.तहसीलदार पुढे म्हणाले की, दहावी बारावी मध्ये बोर्डात येण्याचे समाधान पाहण्या बरोबरच कोकणातील विद्यार्थी व पालक यांनी स्पर्धा परीक्षा पद्धती व अभ्यासक्रम समजून घेतला पाहीजे. यासाठी शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा देत राहिल्यास विद्यार्थ्यांची 50% तयारी होत असते. युनिक अकॅडमी कणकवली येथे शालेय स्तरापासून अधिकारी पदा पर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षा यंत्रणा आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्वतःची मानसिक व शारीरिक तयारी गरजेची असते, पूर्वीसारखी परिस्थिती आता राहिलेली नाही आता दोनवेळचे अन्न मिळते आणि अधिकारी यासाठी व्हा की ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी यांना उत्तम प्रशासकीय सेवा देण्यासाठी अधिकारी व्हायला हवेत. असा सल्लाही उपस्थित विद्यार्थ्यांना तहसीलदार मा. पवार यांनी दिला. या प्रसंगी गुरुकुल अकॅडमी चे दत्ता केसरकर सर म्हणाले की, केवळ दहावी बारावी मध्ये कोकण अव्वल येऊन चालणार नाही तर स्पर्धा परीक्षेतून अधिकारी निर्माण होणे गरजेचे आहेत त्यासाठी जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी युनिक अकॅडमी कणकवली हा उत्तम पर्याय आहे. त्याचप्रमाणे चैतन्य क्लासेसचे प्रमुख अच्युत देसाई सर म्हणाले की, पालक विद्यार्थी यांच्या मध्ये स्पर्धापरीक्षा देण्याबद्दल ची मानसिकता तयार होत असून आगामी काळात जिल्ह्यामध्ये कोकणातील अधिकारी घडतील त्यात युनिक अकॅडमी कणकवली महत्त्वाचे कार्य करेल. युनिकचे संचालक सचिन कोर्लेकर यांनी प्रस्ताविक आणि आभार मानले. तसेच शनिवारी व रविवारी असलेल्या मोफत डेमो लेक्चरचा विद्यार्थ्यांनी लॅब लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी सचिन कोर्लेकर यांनी केले.

शनिवार आणि रविवार…15 -16 ऑक्टो.2022

सकाळी 10 ते सायं 4…

प्रतिक्रिया व्यक्त करा