-प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयकृष्ण फड
सिंधुदुर्गनगरी
कोविड- 19 मुळे गेली दोन वर्षे क्रीडा स्पर्धेचे आयोजन होऊ शकले नाही.पण आता कोविड प्रार्दुभाव कमी झाला आहे. त्यामुळे तालुका, जिल्हास्तावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे. येत्या कालावधीत विविध शालेय व इतर क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा कार्यक्रम निश्चित करावा. जिल्ह्यामधून जास्तीत जास्त खेळाडू राज्यस्तर,राष्ट्रीयस्तर व आंतराष्ट्रीयस्तरावर जावेत, यासाठी क्रीडा विभागा बरोबरच इतर संबंधित विभागांनीही जाणिवपूर्वक प्रयत्न करावेत, असे आदेश प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयकृष्ण फड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा क्रीडा परिषदेचे आढावा बैठक संपन्न झाली . यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर, जिल्हा परिषदेच्या एम.एम.बेहरे, प्राथमिक शिक्षण विभगाचे ए.ए. अवटी, माध्यामिक शिक्षण विभागाच्या श्रध्दा देसाई, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे आदी उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी क्रीडा विभागाचा आढावा सादर करताना सांगितले, जिल्हा स्तारावर एकूण 49 अनुदानित व 44 विनाअनुदानित खेळ प्रकाराचे आयोजन करण्यास शासनाने मान्यता प्रदान केली आहे. इ.6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हास्तरावर ॲपची निर्मिती करण्यात येणार आहे. क्रीडा विभागाच्या वतीने येत्या काळात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.फड यावेळी म्हणाले, क्रीडा विभागाने आधुनिक पध्दतीने कामकाज करण्यावर भर द्यावा. खेळाडू, पालक, क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य,यांना क्रीडा प्रकारांची, क्रीडा क्षेत्रातील योजनांची, क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची परिपूर्ण माहिती व्हावी, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. इ.6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हास्तरावर ॲपची निर्मिती करण्यात येणार आहे त्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी. जिल्ह्यातील खेळाडूंचे मनोधैर्य वाढविण्यासाठी क्रीडा विभागाबरोबरच, शिक्षण विभागानेही प्रयत्न करावेत असे ते शेवटी म्हणाले. तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी आभार मानले.