You are currently viewing अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्यामुळे आलिशान कारचा अपघात.

अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्यामुळे आलिशान कारचा अपघात.

कोणीही जखमी नाही; मात्र गाडीचे नुकसान…

सावंतवाडी

अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्यामुळे आलिशान कारला अपघात झाला. ही घटना आज पहाटेच्या सुमारास कारिवडे – बुर्डी पूल परिसरात घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात विचारले असता आपल्याकडे कोणती नोंद नसल्याचे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा