*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*नाही भरवसा क्षणाचा…*
विश्वास का करी मानवा
क्षणभंगुर जीवनाचा,
अंतिम सत्य आहे मृत्यु
नाही भरवसा क्षणाचा..।
मानवाचे जीवन आहे
बुडबुडा एक पाण्याचा,
येण्याचा आनंद कशाला
क्षण येतो बघा जाण्याचा..।
मोठे मोठे आले नि गेले
अनंतात विलीन झाले,
येण्याचिही मर्जी नव्हती
जातांना ओढूनिया नेले..।
मरण्याची इच्छा कुणाला
जगण्याची आशा असते,
काळाची महीमा अशी की
अपुल्या हाती काही नसते..।
हे माझे अन तेही माझे
अंतहीन अपुली हाव,
हे जग आहे धर्मशाळा
मोक्ष हे मानवाचे गांव..।
पुण्य मिळते ज्यापासूनी
असे नेहमी करा कृत्य,
मिथ्या आहे हे जग आणि
ब्रह्म आहे अंतीम सत्य..।
✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:- 9420095259*