You are currently viewing चिठ्ठी आयी है

चिठ्ठी आयी है

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर यांनी डाक सप्ताहा निमीत्ताने लिहिलेला अप्रतिम लेख*

*चिठ्ठी* *आयी है*

दुनिया बदलली. नवी तंत्र विकसित झाली.
जुन्याला रामराम आणि नव्याला सलाम.
मीडीया,संगणक,मोबाईलने तर मानवी जगात धुमाकूळ घातलाय.जग जवळ आलं. पूर्वी म्हणायचे,मांजर पादलं तरी गावभर कळते..
आताही तसंच ना..जगातल्या कोपर्‍यातली कुठलीही घटना एका क्षणात विश्वभर पसरते.
वैयक्तीक पातळीवरही व्हाट्सअप,ई मेल ही प्रचंड ताकदीची संपर्क यंत्रणा आज आहे…
पण क्षणभर मागे वळून पाहिलं की खाकी वर्दीतला ,उन्हातान्हात सायकलीवरुन फिरणारा,
दारादारात वेगवेगळे संदेश पत्रातून घेउन येणारा
तो डाकीया…तो पोस्टमन ..ज्याची कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आतुरतेने वाट पाहिली जायची ..जो कधी तर आपला कुटुंबीयच बनायचा..तो कुठे हरवला….
मला आठवतंय्,आम्ही साठ बासष्ट साली काश्मीरला महिनाभर फिरायला गेलो होतो.
आजीला प्रकृती कारणामुळे नेता नाहीआलं.
ती घरी एकटीच राहिली.
तेव्हां संपूर्ण ट्रीपमधे वडील आजीला रोज खुशालीचे पत्र पाठवायचे.
आणि घरी आजी पोस्टमनची वाट पहात उभी असायची…त्याला विचारायची..”ए दादा माझं
पत्र आणलंस का?”
आणि आजीचं पत्र पोस्टमन जवळ असलं की त्यालाही खूप आनंद व्हायचा ते तिला देताना…
अशी भावनिक नाती होती पोस्टमनशी.
लग्नानंतर मी आईवडीलांपासून साडे चारशे किलोमीटर दूर गेले…सुरवातीला वडील माझ्या नावे लांबलचक तारा पाठवायचे.. सासरी.घबराट व्हायची..पण नंतर ,
“बाबी आज अनुराधात तुझी कथा आली आहे ..” असे मजकुर वाचून त्यांना आश्चर्य आणि गंमत वाटू लागली…सासरच्या दारात तार घेउन येणारा पोस्टमनही हसायचा…
पण पोस्टमन हा दुवा होता.
पत्रावरचा ओळखीच्या अक्षरातला आपला पत्ता वाचताना,आणि उत्सुकतेनं उलगडून मजकुर वाचताना जो प्रेम जिव्हाळ्याचा भाव जाणवायचा ,तो जिवंतपणा ई मेल मधे असतो का हो….?
मी सगळ्यांची पत्रं आजही जपून ठेवली आहेत..
त्या पत्रांत माझ्या आईचं,वडीलांचं,आजीचं अक्षर आहे.ते अक्षर नाही ते मायेचे मोती आहेत…
पत्रं जपली आहेत तशीच चिट्ठी आयी रे म्हणणारा तो पोस्टमन मनात आहेच…
मला पोस्टमन बद्दल आणखी आदर वाटायचा ,
तो त्याला गल्लीगल्लीतले पत्ते आणि घरं कशी
लक्षात राहतात…हा कधीच रस्ता चुकत नाही..
चोरटेपणाने वाटायचे मी जर पोस्टमन झाले असते तर एकही पत्र बरोबर पोहचलं नसतं..कारण रस्ते चुकण्यात मी पटाईत…
आताही पोस्टमन येतो…पण हा पोस्टमन तो नव्हे..
हा आणतो चेकबुक.
हा आणतो एटीएम कार्ड.
हा आणतो ईन्कम टॅक्सची नोटीस.
हा आणतो कोर्टात पिढ्या न पिढ्या चाललेल्या
केसचं समन्स…
हा नाही आणत पत्रं.ना पोस्टकार्ड.ना अंतर्देशीय.
ना पाकीट…
त्याचा तरी काय दोष…
कारण आता कोणी पत्र लिहीतच नाही..

राधिका भांडारकर पुणे

Advertisement

*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃

*💁‍♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔

*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*

*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*

*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*

*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*

*ऑफिस नं. 9637163129*

*Web link*

प्रतिक्रिया व्यक्त करा