You are currently viewing कुडाळात आज नवीन अग्नीशमन वाहनाचा लोकार्पण सोहळा संपन्न..

कुडाळात आज नवीन अग्नीशमन वाहनाचा लोकार्पण सोहळा संपन्न..

आमदार सतेज पाटील आणि खासदार विनायक राऊत यांचे हस्ते उद्घाटन

 

कुडाळ :

कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने जिल्हा नियोजन निधीतून 76 लाख रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेल्या नवीन अग्नीशमन वाहनाचा लोकार्पण सोहळा आज कुडाळ नगरपंचायत पटांगणात संपन्न झाला.

माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आणि कुडाळ नगराध्यक्षा आफरीन करोल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या वाहनाचा लोकार्पण करण्यात आले.

यावेळी महविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांचे काँग्रेसच्या वतीने काढण्यात रॅलीद्वारे समारंभ स्थळी आगमन झाले.

त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात विनायक राऊत यांच्या हस्ते दीप प्रज्वल करून हस्ते उद्घाटन करण्यात आले. यात विनायक राऊत आणि वैभव नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या लोकार्पण सोहळ्यात आमदार सतेज पाटील, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, नगराध्यक्षा आफ्रीन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, विजय प्रभू, इर्शाद शेख, राष्ट्रवादीचे काका कुडाळकर, अतुल रावराणे, अरुण दुधवडकर, नगरसेविका अक्षता खटावकर, श्रुती वर्दंम, श्रेया गवंडे, संतोष शिरसाठ, सचिन काळप, किरण शिंदे, श्रीराम शिरसाठ, प्रसाद शिरसाठ, तसेच काँग्रेस, शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा