You are currently viewing काळ्या दगडाचे स्फोटक वापरून चालू असलेले उत्खनन विरोधात कारवाई करा; स्थानिक ग्रामस्थांसहित भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी आक्रमक

काळ्या दगडाचे स्फोटक वापरून चालू असलेले उत्खनन विरोधात कारवाई करा; स्थानिक ग्रामस्थांसहित भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी आक्रमक

जिल्हाध्यक्ष नवलराज काळे मालवण तालुका अध्यक्ष बाळा गोसावी यांनी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची भेट घेत दिले निवेदन

मालवण

दि. 11/10/2022 रोजीचा ओवळीये स़डा धनगरवाडी ग्रामस्थांचा तक्रार आजचा संदर्भ घेत जिल्हाध्यक्ष नवलराज काळे व मालवण तालुका अध्यक्ष भटके विमुक्त आघाडी मा. बाळा गोसावी साहेब यांनी ओवळीये स़डा धनगरवाडी येथील काळ्या दगडाचे स्फोटक वापरून चालू असलेले उत्खनन स्थळी भेट दिली या धनगर वस्तीतील घरांची पाहणी केली असता ग्रामस्थांनी तक्रार अर्जामध्ये लिहिलेले सर्व गोष्टी तपासून पाहिल्या प्रत्येक घराला तीव्र गतीच्या स्फोटकामुळे तडे गेले अनेकांचे अनेक बाबीचे नुकसान या ठिकाणी झाले हे पाहणी दरम्यान निदर्शनास आले या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष नवलराज काळे व तालुका अध्यक्ष बाळा गोसावी यांनी स्थानिक ग्रामस्थांसहित 13 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट यावेळी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे मालवण तालुका अध्यक्ष बाळा गोसावी यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस शशिकांत इंगळे, मालवण तालुका उपाध्यक्ष सुशील खरात, मालवण तालुका भाजपा युवा संजय शिंगाडे, ओवळीये सडा धनगरवाडी येथील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची भेट घेण्यात आली. घडलेला संपूर्ण प्रकार जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष यांनी बर्गे यांना सांगितला. अपर जिल्हाधिकारी बर्गे यांच्याकडे सुपूर्द केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की उपरोक्त संदर्भीय विषयानुसार दि. 11/10/2022 रोजी ओवळीये स़डा धनगरवाडी येथील ग्रामस्थांच्या तक्रारी नुसार व ओवळीये स़डा धनगरवाडी येथील चालू असलेल्या काळ्या दगडाचे स्फोटक वापरून उत्खनन कामाची पाहणी केली असता सदर उत्खनन हे तीव्र स्फोटकाचा वापर करून करण्यात येत आहे. ओवळीये सडाधनगरवाडी येथील या उत्खननाच्या जवळ अंतरावर सुमारे 20 ते 22 घरे व जवळपास 150 लोकवस्ती आहे. स्फोटकाचा वापर केल्यामुळे सदर वस्तीतील घरांना तडे गेले असून भविष्यात त्या ठिकाणी अशाच प्रकारची स्फोटके वापरून उत्खनन चालू राहिल्यास जिवीतहानी देखील होऊ शकते तरी, ग्रामस्थांच्या तक्रारी अर्जाची दखल घेत व आमच्या निवेदनाचा सहानुभूतीपुर्वक विचार करून सदर उत्खनन विरोधात योग्यती कारवाई करुन ओवळीये स़डा धनगरवाडी येथील समाजास न्याय मिळवुन द्यावा. योग्यती कारवाई बाबत कळावे असे नमूद केले आहे. स्पोटकांमुळे घराचे तडे गेले असून सदर घडलेला प्रकार अतिशय भयानक असून घरांना पडलेल्या तड्यांचे फोटो देखील या ठिकाणी पुरावे म्हणून संबंधितानी प्रशासनाकडे सादर केले आहेत. घडलेल्या सर्व प्रकारावर आणि झालेल्या पत्र व्यवहारावर प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार आहे याकडे सर्वांचे लक्ष आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा