You are currently viewing शेतकरी बाप

शेतकरी बाप

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

*शेतकरी बाप*

बाप माझा शेतकरी
काळ्या वावरी कष्टतो
कामाने राबराबतो
चिंब घामाने भिजतो

पाटाच्या पाण्यात गातो
त्याच्यासंगे पांडुरंग
रान पाखरेही गाती
बा च्या संगती अभंग

माय माझी रखुमाई
तिचा पदर फाटका
जन्मभर कष्ट करी
करी संसार नेटका

डवरल्या कणसात
मोतियाचा दाणा भरे
पाही पाखरांचा थवा
सांगे खावुनी घ्या बरे

गाई गुरे श्वान सारे
सारे बाचेच सोबती
भल्या पहाटे उठुन
झणी त्यास उठवती

रान पाखरांच्या संग
बा गातो अभंग
विठ्ठल नामात रंगुन
काळ्या मातीतच दंग

आषाढी कार्तिकी वारी
बा ची कधी न चुकली
त्याच्या कष्टाला राहु दे
नित्य विठुची सावली

*शीला पाटील. चांदवड.*

Advertisement

*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃

*💁‍♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔

*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*

*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*

*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*

*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*

*ऑफिस नं. 9637163129*

*Web link*

प्रतिक्रिया व्यक्त करा