वेंगुर्ले :
वेंगुले येथील कै. मधुसुदन कालेलकर सभागृहात भाजपचे युवा नेतृत्व तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून “विशाल श्री” शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोव्याचे आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून गोव्याचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जीत आरोलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. “विशाल परब याच्या मध्ये तेज आहे. म्हणून मी त्याला आजच नाव देतो की “स्पार्कींग मॅन”. भविष्यात मी अभिमानाने सांगतो की विशाल परब हे शंभर टक्के खासदार किंवा आमदार होणारच आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. विशाल मी तुला शब्द देतो की वेंगुर्ल्या तालुक्याच्या शेजारी माझा मतदार संघ आहे. येथील मुल जी कामाला येतात त्यांना कुठलीच अडचण मी येवू देणार नाही. विशाल परब यांच्या सारखा मला दिलदार मित्र लाभला याचे मी भाग्य समजतो. विशाल परब यांनी जे जीवनात कमी कालावधीत कमवल आणी यश मिळवल ते साध नाही. त्यासाठी जिद्द आणी मेहनत आहे. खरोखरच विशालला मी वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देत असल्याचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना मांद्रे विधानसभा मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितल.