वेंगुर्ला
वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी आई वडिलांचे छत्र डोक्यावरून हरपलेल्या कु.अवनी अंकुश ढवण या बलिकेसाठी भाजपचे नेते खासदार डॉ.निलेश राणे हे देवदूतासारखे धावून आले आहेत. वयोवृद्ध आजीसोबत कु.अवनी परुळे येथे राहत आहे. वडिलांचे निधन झाल्यानंतर काहीच दिवसात आई सुद्धा देवाघरी गेली, त्यामुळे कोवळ्या वयातच अवनी पोरकी झाली. वयोवृद्ध आजीसोबत राहत असलेल्या अवनीच्या पालनपोषण आणि शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला होता.

खास.डॉ.निलेश राणे यांनी कु.अवनीची झालेली एकूण परिस्थिती ऐकून त्यांनी तात्काळ तिला आर्थिक मदत उपलब्ध करून दिली तसेच दहावी पर्यंतच्या तिच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वतः घेत आपल्या हृदयात सुद्धा मायेचा झरा वाहत असल्याचे दाखवून दिली. बाहेरून कणखर वाटणारे, बोलणारे निलेश राणे जिल्ह्यातील जनतेच्या भावना जाणून घेत त्यांच्यासाठी धावून जातात हे पाहिल्यावर त्यांच्यातील माणुसकीचे समाजातून कौतुक केले जात आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील परुळे गावातील कु.अवनी ही सात वर्षांची मुलगी. वडिलांच्या पाठोपाठ आईचे छत्रही हरवल्यानंतर आजीची माया यावरच ती जगत होती. वयस्कर आजीसोबत राहत असल्याने तिची होणारी हालत समजताच भाजपचे नेते डॉ.निलेश राणे यांनी भाजपायुमो चे जिल्हा सरचिटणीस बाबा परब यांच्या हस्ते आर्थिक मदत सुपूर्द केली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आजवर जिल्ह्यातील अनेकांना मदतीचा हात दिलेला आहे. त्यांच्या दातृत्वाची ओळख जिल्हावासीयांना आहेच. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत डॉ.निलेश, आणि आमदार नितेश राणे अनेकांना मदत करत असतात. त्याचीच प्रचिती माजी खासदार डॉ निलेश राणे यांनी पुन्हा एकदा दाखविली.
