इचलकरंजी
शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ विचारवंत, संपादक , प्रथितयश साहित्यिक, अनाथांचे आधारवड, अनेक सामाजिक संस्थांचे मार्गदर्शक अशी प्राचार्य डॉक्टर सुनीलकुमार लवटे
यांची सर्वदूर ओळख आहे.अशा अनुभवीसंपन्न ऋषीतुल्य व्यक्तीमत्वाचा त्यांनी आयुष्यभर केलेल्या सामाजिक कार्याच्या सन्मानार्थ इचलकरंजी येथे विविध शिक्षण , सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने
रविवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी महेश क्लबमध्ये दुपारी चार वाजता कृतज्ञता सोहळा म्हणून जाहीर सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम ख्यातनाम वक्ते ,माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे कृतज्ञता सोहळा समितीच्या वतीने सुनील स्वामी यांनी पञकार बैठकीत बोलताना दिली.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत स्वतःला घडवणारे आणि तरीही प्रेमाचा संदेश देणारे संत कबीर, महात्मा गांधी आणि साने गुरुजींचा वसा पुढे नेणारे तसेच नवतंत्रज्ञान आत्मसात करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अध्यापनाच्या क्षेत्रात काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे यांची ओळख सर्वदूर पोहोचली आहे.विशेष म्हणजे शिक्षण , साहित्य व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अज्ञान ,जातीय विषमता दूर करतानाच समता , बंधुता ,प्रेम निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु ठेवला आहे.त्यामुळे निकोप समाज निर्मितीसाठी त्यांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे.अशा अनुभवी संपन्न ऋषीतुल्य व्यक्तीमत्वाचा त्यांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इचलकरंजी शहरातील विविध शिक्षण आणि सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने रविवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी महेश क्लब येथे दुपारी चार वाजता जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संत तत्वज्ञानाचे अभ्यासक , ख्यातनाम वक्ते व माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख आणि अध्यक्षस्थानी इचलकरंजी महानगरपालिकेचे प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी प्रा.डाॅ.सुनीलकुमार लवटे यांचा सत्कार सन्मान चिन्ह, मानपत्र आणि इचलकरंजी परिसरातील विविध लेखक, कवींची प्रकाशित पुस्तके देऊन होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर सुनीलकुमार लवटे कृतज्ञता सोहळा समितीचे सुनील स्वामी यांनी पञकार बैठकीत बोलताना दिली.तसेच या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देखील प्राचार्य डॉक्टर सुनीलकुमार लवटे कृतज्ञता सोहळा समितीच्या वतीने केले.या पञकार बैठकीस समितीचे डी.एम.कस्तुरे ,डी.बी.टारे ,प्रा.मोहन पुजारी , अमोल पाटील आदी उपस्थित होते.
Advertisement
*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*
*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*
*_👨👩👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*
*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*
*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*
*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*
*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*
*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*
*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*
*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*
*🏃🏻♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*
*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*
*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*
*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*
*Advt link*
————————————————