कुडाळ
दक्षिण भारताचे सुप्रसिद्ध आध्यात्मिक व मेडिटेशन गुरु श्री सत्य मामुनी यांच्या प्रथम मेडिटेशन शिबिरात गोवा आणि कोकणातून जो अभूतपूर्व उत्साह दाखवला त्यामुळे मेडिटेशन शिबिर अत्यंत यशस्वी झाले.
अनेकांनी मेडिटेशन शिकणेबाबत श्री सत्य मामुनी स्वामी यांच्या आधुनिक वैज्ञानिक व आध्यात्मिक मेडिटेशन शिबिर आयोजित करावे अशी मागणी केली होती.
म्हणूनच मेडिटेशन शिबिराचा दुसरा टप्पा आयोजित करण्यात आला असून त्यासाठी पुढील प्रमाणे मेडिटेशन वर्ग व शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे..
टप्पा क्रमांक १..-
वार – शनिवार, दिनांक १५/१०/२०२२,
ठिकाण – पणजी (गोवा)
कार्यक्रमाचे स्वरूप-
दिवस पहिला-
श्री सत्यमामुनी स्वामीजी यांच्या प्रत्यक्ष सुश्राव्य वाणीतून आणि मार्गदर्शनातून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक स्वरूपात मेडिटेशन घेण्यात येईल.
वेळ – सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत.
टप्पा क्रमांक २
दिवस २ रा ते ४१ वा
ऑनलाईन मेडिटेशन क्लासेस, झूम मीटिंग व व्हाट्सअप क्लास
टप्पा क्रमांक ३
दिवस ४२ वा
प्रत्यक्ष मेडिटेशन गुरु श्री सत्य महामुनी महाराज यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या मेडिटेशन संदर्भात शंकांचे निरसन केले जाईल.
दरम्यान याच कालावधीत
दक्षिण भारताचे सुप्रसिद्ध आध्यात्मिक व मेडिटेशन गुरु श्री सत्यमामुनी स्वामीजी यांच्या स्वानुभवातून आणि सानिध्यातून आलेले मेडिटेशनचे फायदे आणि सुयोग्य प्रात्यक्षिके यांचा प्रत्यक्षरीत्या अनुभव देणारा मेडिटेशन वर्ग घेण्यात येईल. तरी आध्यात्मिक आणि मेडिटेशनची आवड असणाऱ्या भाविक भक्त व तमाम स्नेहीजन यांना विनम्र आवाहन करण्यात येते की, आपण दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध मेडिटेशन गुरु श्री सत्यमामुनी स्वामीजी यांच्या सानिध्यातून आपल्या जीवनाला अत्यंत कलाटणी देणाऱ्या योग शिबिराचा फायदा करून घ्यावा व आपल्या जीवनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणावेत.
संपूर्ण माहिती व शिबिराच्या माध्यमातून होणाऱ्या एकूण गोष्टींबद्दल अधिक माहितीसाठी प्राध्यापक डॉ.राजाराम परब मोबाईल क्रमांक यांच्याशी 93250 17458 संपर्क साधावा,
असे आवाहन करण्यात आले आहे.
“मेडिटेशन मुळे आपल्या जीवनात अमुलाग्र बदल होतो. मनाच्या शांततेसाठी आणि दैनंदिन कार्याच्या सुयोग्य परिपूर्ततेसाठी मेडिटेशन अत्यंत उपयुक्त आहे.
अनेकांच्या मागणीनुसार श्री सत्य मामुनी यांच्या शास्त्रोक्त मेडिटेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.”
प्रा. राजाराम परब..